फायनान्शियल इन्फ्लुएंसर रवींद्र भारतींना शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचेही सेबीचे आदेश

  • Written By: Published:
फायनान्शियल इन्फ्लुएंसर रवींद्र भारतींना शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचेही सेबीचे आदेश

SEBI action against Ravindra Balu Bharti : झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर मार्केटचे (Stock market) क्लास लावतात. तर काही जण फायनान्शियल इन्फ्लुएंसरकडून Financial Influencer) आर्थिक सल्ला घेतात. मात्र, आता स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या एका फायनान्शियल इन्फ्लुएंसरला सेबीने लगाम लावलाय. रवींद्र भारती (Rabindra Bharti) असं फायनान्शियल इन्फ्लुएंसरचे नाव आहे.

संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?

सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवर 4 एप्रिल 2025 पर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातलीये. याशिवाय सेबीने बेकायदेशीर व्यवहारांसाठी भारती अन् त्यांच्या फर्मला 9.5 कोटींचे बेकायदेशी उत्पन्न परत करण्याचेही आदेश दिलेयेत.

या प्रकरणी सेबीनं शुभांगी रवींद्र भारती, राहुल अनंत गोसावी अन् धनश्री चंद्रकांत गिरी यांना 4 एप्रिलपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातलीये.

ही कारवाई करतांना सेबीने म्हटलंय की, रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूटने आपल्या कॅम्पस आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनुभव नसलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नॉन रजिस्टर गुंतवणणूकीचा सल्ला दिलाय. शिवाय, फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती यांच्या पतपात्रतेच्या आधारे हाय रिटर्नचं मार्केटिंग केलं. करारातील जोखीमेची क्लायंटला पूर्णपणे माहिती दिली नाही. त्यानुसार सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूटला 6 टक्के व्याजानुार 9.5 कोटींची रक्कम परत करण्याचे आदेश दिलेत.

Video : लोकशाहीची जननी म्हणून भारताची ओळख; लोकसभेतील संविधान चर्चेवर मोदींचं विधान 

सोबत सेबीने रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूटला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय

दरम्यान, रवींद्र भारती हे रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत. सोबतच ते भारती शेअर मार्केट मराठी आणि भारती शेअर मार्केट हिंदी असे दोन YouTube चॅनेलही चालवतात. मात्र, रवींद्र भारतीं गुंतवणूक सल्लागार सेवा देणे किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणे थांबवावे लागेल, असंही सेबीनं म्हटलं.

दरम्यान, आजकाल अनेक YouTubers शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबद्दल सल्ले देतात. मात्र, बहुकते इन्फ्लुएन्सर सेबी प्रमाणित सल्लागार नसतात. त्यामुळं अशा इन्फ्लुएन्सर सल्ला घेतांना आवश्यक ती काळजी घ्यावी…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube