Download App

Government Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना

Government Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission)काय आहे? प्लास्टिक मल्चिंगचा (Plastic Mulching)वापर का करायला हवा? फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation)टाळले जाऊ शकते का? पिकासाठी या मल्चिंग पेपरचा काय उपयोग होतो? याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

‘माझ्याकडं 27 फोटो अन् 5 पाच व्हिडिओ, भाजपचं दुकानच बंद पडेल’; संजय राऊत कडाडले

प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिकं घेताना केला जातो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय? योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं काय? अर्ज कोणाकडे करावा? आदीबद्दल आपण जाणून घेऊया…

धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

अनुदान किती?
– या योजनेंतर्गत अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर 32 हजार रुपये आहे. त्या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्‍टरप्रमाणे कमाल दोन हेक्‍टरपर्यंतच अनुदान दिले जाते.
– डोंगराळ भागासाठी हे अनुदान प्रतिहेक्‍टर 36 हजार 800 रुपये असणार आहे. त्या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18 हजार 400 रुपये एका हेक्‍टरप्रमाणे दोन हेक्‍टरसाठी अनुदान दिले जाणार आहे.

प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय?
वनस्पतीची मुळं चांगली वाढतात.
शेतातील मातीची धूप रोखली जाते.
तणापासून संरक्षण होते.
शेतात पाण्याचा ओलावा कायम राखते आणि बाष्पीभवन रोखले जाते.
तण नियंत्रित करुन वनस्पतींसाठी दीर्घ काळापासून संरक्षण करते.
जमीन कडक होण्यापासून वाचवण्यास मदत.

आवश्यक पात्रता काय?
शेतकरी
बचत गट
शेतकरी समूह
शेतकरी उत्पादक कंपनी
सहकारी संस्था या योजनेत सहभागी होऊन अर्थिक मदत मिळवू शकतात.

आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्डची झेरॉक्स
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
7/12 उतारा
8-अ प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा?
या योजनेच्या माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा. या योजनेची अधिक माहिती मिळवावी.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us