धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

Dhangar Reservation : राज्यात (Maharashtra)धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation)पुन्हा एकदा जामखेड (Jamkhed)तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena)उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणस्थळी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी भेट दिली. त्यावेळी धनगर आरक्षणावर त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. धनगर आरक्षण प्रश्न शासन दरबारी असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

Chagan Bhujbal : आम्ही कोणाची घरं जाळली? समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रश्नावर भुजबळ भडकले

धनगर समाजाच्यावतीने चौंडी येथे तब्बल 21 दिवसांचे उपोषण केले होते. यावेळी प्रशासनाकडून आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते, तसेच यावेळी सरकारला 50 दिवसांची मुदत देखील देण्यात आली होती. यावेळी मुदत संपल्यानंतर देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले गेले नसल्याने यशवंत सेनेच्यावतीने पुन्हा एकदा अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

राम शिंदे म्हणाले…
चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला आमदार राम शिंदे यांनी भेट दिली. यासंबंधी मी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने शिष्टमंडळ व अभ्यास गट स्थापन करावयाच्या जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

धनगर आरक्षणावरती शासन देखील गांभीर्याने लक्ष देत असून याबाबत शासन निर्णय झाला आहे. आता तातडीची बैठक देखील बोलवण्यात आली असल्याची माहिती यावेळेस राम शिंदे यांनी दिली. मध्य प्रदेश बिहार व तेलंगणा या राज्यांमध्ये जाऊन हा अभ्यास गट अभ्यास करणार आहे, तसेच समिती तात्काळ हा अहवाल सरकारकडे सादर करेल असेही यावेळी आमदार राम शिंदे यांनी सांगितले.

उपोषणकर्ते दोडतले म्हणाले…
प्रशासनाकडून 50 दिवसांपूर्वीच आरक्षणासंदर्भात काहीतरी ठोस पाऊस उचलणे गरजेचे होते मात्र असे न झाल्याने आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसलो आहोत. उपोषणानंतर राज्य सरकारकडून आता हालचालींना वेग प्राप्त झाला असून तातडीने हा जीआर प्राप्त झाला आहे. जीआर दिला म्हणजे काम संपलं नाही आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल तसेच आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा त अन्यथा तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही यावेळी यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube