Chagan Bhujbal : आम्ही कोणाची घरं जाळली? समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रश्नावर भुजबळ भडकले
Chagan Bhujbal On Manoj Jarange : राज्यामध्ये (Maharashtra)सुरु असलेली पेटवापेटवी आम्हाला देखील नको आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवता, तुम्ही वातावरण अशांत करता, त्यांना विचारा की आम्ही कोणाची घरं जाळली? कोणाला शिव्या दिल्या? असा थेट सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी केला आहे. समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, पण ते कोण करतंय? त्यांचे कान अगोदर पकडले पाहिजे, असेही यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले. त्याचवेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
‘मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर पुजारी पळून जातील’; वडेट्टीवारांचं नवा वाद पेटवणारं विधान
भुजबळांवर विरोधकांकडूनही समाजात तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप केला, त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, मला सांगा, जाळपोळ कोणी केली? गावबंदीचे बोर्ड कोणी लावले? जाळपोळ काय आम्ही केली का? 14-14 सभा घेऊन आमच्या विरोधात कोण बोलले? शिवीगाळ कोणी केली? त्यावेळी कोणाला वाटलं नाही का की, समाजा-समाजामध्ये वितुष्ट निर्माण होतंय? आणि मी फक्त त्याला आवाज फोडण्याचं काम केलं. गेली दोन महिने झालं आम्ही सर्व ऐकतोय, धमक्या ऐकतोय, पोलिसांकडे किती तक्रारी आम्ही केल्या. त्याच्यापुढे जाऊन प्रत्यक्ष घरांवर हल्ले केले असेही भुजबळ म्हणाले.
मोहम्मद शमीने मारली पंतप्रधान मोदींना मिठी, फायनल हारल्याने अश्रू अनावर
छगन भुजबळ म्हणाले की, गेली 56-57 वर्षे झाली राजकीय क्षेत्रात काम करत आहे. मंत्री म्हणून मलापण समजतंय ना, असंही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. मी देखील छोटा-मोठा नेता आहे.
समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, पण ते कोण करतंय? त्यांचे कान अगोदर पकडले पाहिजे असेही यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ओबीसींकडून एकही टायर जाळलेला नाही, सर्वकाही तेच करत आहेत. कोणाला शिवी दिलेली नाही, कोणाचं हॉटेल, घर, दुकान जाळलेलं नाही, जे या गोष्टी करतात त्यांना अगोदर बोला असा टोलाही यावेळी मंत्री भुजबळांनी लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या 14 सभा झाल्यानंतर माझी एक सभा झाली. त्यांच्या रोज 10-10 सभा सुरु आहेत. रात्री 10 ला सभा, 12 ला, 4 ला सभा त्यांच्या सभांना काही कायद्याची बंधनं नाहीत, ठिक आहे मला मान्य आहे, त्यांना मुभा आहे.
अंबडमधील सभा ओबीसींची सभा ही मी घेतली नव्हती, ती स्थानिक नागरिकांनी घेतली होती, मी त्या ठिकाणी फक्त वक्ता म्हणून गेलो होतो. हिंगोलीची सभादेखील काही स्थानिक लोक घेत आहेत, त्या सभेचं मला आमंत्रण आलेलं आहे, असंही यावेळी मंत्री भुजबळ यांनी सांगितले.