Government Schemes : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकर्यांच्या (Farmer)हितासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. त्यामध्ये शेतीतील उत्पादन वाढण्यापासून ते चांगल्या दर मिळण्यापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme). पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील केली जाते.
“..तर महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री मीच”; ठाकरे-फडणवीस वादावर आठवलेंचं मिश्किल भाष्य
म्हणजेच योजनेतून शेतकऱ्यांना अनेकविध प्रकारे मदत केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, ही योजना आहे तरी काय? आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो? तसेच या खास योजनेचा फायदा कोणते शेतकरी घेऊ शकतात? आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे शेतकरी बांधव सिंचनासाठी सरकारकडून अनुदान घेऊ शकतात? हेच सविस्तर पाहूया…
भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..
काय आहे योजना? :
– केंद्राने शेतीला पाणी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतात सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे. या योजनेत शासनाच्यावतीने नवीन जलस्रोत तयार करणे, जलसाठा, भूजल विकास आदी कामे केली जातात.
– तसेच या योजनेत सिंचन उपकरणे व योजनांवर सरकारकडून भरीव अनुदान दिले जात आहे. ज्यात प्रत्येकजण पाणी, खर्च आणि कष्टांची बचत करतो.
– सरळ शब्दांत सांगायचे तर, आपण नवीन मार्गाने सिंचन केले तर सरकार शेतकऱ्यांना त्याची उपकरणे खरेदी करण्यात मदत करते.
– या योजनेतून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन आदींना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच प्रत्येक पिकाच्या आधारे सिंचनाचा सल्ला दिला जात आहे. जेणेकरून केवळ पाण्याची बचत होणार नाही तर उत्पादनही वाढू शकेल. योग्य वेळेत सिंचन न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल? : या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती आणि पाण्याचे स्त्रोत आहेत, अशा शेतकर्यांना लाभ देण्यात येतो. तसेच या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, जे कंत्राटी शेती करीत आहेत आणि सहकारी सदस्य, बचत गटांनाही लाभ देण्यात येत आहे.
आवश्यक पात्रता :
– शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
– लाभार्थी शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
– शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
– जर लाभार्थ्याने 2016-17 च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
– जर लाभार्थ्याने 2017-18 च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतल्यास त्याला पुढील 7 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
– शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
– सूक्ष्म सिंचनप्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
– शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
– शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– 7/12 प्रमाणपत्र
– 8-अ प्रमाणपत्र
– वीज बिल
– खरेदी केलेल्या संचाचे बिल
– पूर्वसंमती पत्र
कसा मिळेल फायदा? : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्याचबरोबर आधार कार्ड, खतौनी आदींची माहिती द्यावी लागेल. तसेच या योजनेत शासनाकडून 80 ते 90 टक्के अनुदान सिंचन उपकरणावर दिले जाते.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.