Ahilyanagar district Lumpy In 192 villages : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण पशुधनासाठी धोकादायक ठरणाऱ्या लम्पी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा आता लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना (Farmers News) तातडीने राबवण्यात येणार आहेत.
संपूर्ण जिल्हा आता नियंत्रण क्षेत्र
लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्व गावे ‘लम्पी नियंत्रण क्षेत्र’ म्हणून ओळखली जाणार आहेत. याअंतर्गत जनावरांची खरेदी-विक्री, बाजारपेठा, शर्यती, वाहतूक तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांचे एकत्रिकरण यावर तातडीची बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंबंधी अधिकृत आदेश जाहीर केले आहेत.
“मध्य प्रदेशात EVM घोटाळा, त्याच मशीनवर महाराष्ट्रात निवडणुका”, राऊतांचा गंभीर आरोप
लम्पीचा प्रादुर्भाव असलेली गावे
सध्या जिल्ह्यातील 193 गावांमध्ये लम्पीचा फैलाव नोंदवला गेला आहे. तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:
अहिल्यानगर – 2
अकोले – 4
जामखेड – 4
कर्जत – 23
कोपरगाव – 11
नेवासा – 36
पारनेर – 18
पाथर्डी – 2
राहाता – 25
राहुरी – 13
संगमनेर – 31
शेवगाव – 2
श्रीगोंदा – 14
श्रीरामपूर –19
प्रत्येक बाधित गावासह त्याच्या 10 किलोमीटर परिसरातील वाड्यांचा समावेश या नियंत्रण क्षेत्रात करण्यात आला आहे. बाधित भागातून जनावरांची वाहतूक किंवा निरोगी भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जनावरांसाठी स्वतंत्र पाणी व चाऱ्याची व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारण्या, तसेच भटक्या जनावरांचे नियमित निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
जनावरांचे ऑनलाईन व्यवहार देखील बंद
लम्पीमुळे पशुधनाच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीवरही प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणतीही शर्यत, जत्रा, जनावरांचे प्रदर्शन अथवा बाजार भरवणे यावर बंदी राहणार असून, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. सध्या जिल्ह्यात 888 जनावरे लम्पीने बाधित आहे. त्यातील 514 जनावरे आजारमुक्त झाली आहेत. मात्र 374 जनावरांवर उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 35 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मराठवाड्यात या ‘शेतकरी’ म्हणून संबोधित करा; बच्चू कडूंकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण
जास्त प्रादुर्भाव असलेले भाग
संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवडी, मांडवे, कनोली, रहिमपूर, निमगाव जाळी, चिंचपूर शिपलापूर, पिंपरी तसेच शेवगाव मधील बडुले आणि जामखेड मधील खड या गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला आहे. या भागातील पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला आहे.
कोणती खबरदारी घ्यावी?
पशुधनाच्या संपर्कात आलेली वैरण, गवत, शव, कातडी आणि इतर साहित्य याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गायी, म्हशी यांचे विलगीकरण करून त्यांची स्वतंत्र काळजी घेणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, गृह विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाहतूक विभागाने जनावरांच्या हालचाली पूर्णपणे थांबवाव्यात. स्थानिक प्रशासनाने बाधित जनावरांसाठी स्वतंत्र चारा आणि पाण्याची व्यवस्था, भटक्या जनावरांचे निरीक्षण, आणि बाजारांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. पशुसंवर्धन विभागाला तातडीने लसीकरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.