Download App

Government Schemes : सहकारमित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना आहे तरी काय?

Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे.

अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ फटकार; न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका

सहकार मित्र इंटर्नशिप योजना पात्रता :
– या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक असावा.
– योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण पूर्ण केले, तेदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्यासाठी कृषी, संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करु शकतात.

इंटर्नशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– वयाचा दाखला
– ईमेल आयडी
– आधार कार्ड
– मोबाइल नंबर

कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल?
– प्रकल्प व्यवस्थापन
– आयटी
– शेती व संबंधित क्षेत्र
– वित्त
– सहकार्य
– आंतरराष्ट्रीय व्यापार
– ग्रामीण विकास
– वनीकरण
– प्रकल्प व्यवस्थापन

योजनेंतर्गत कोणता लाभ मिळेल?
– देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
जाईल.
– या योजनेतून देशातील तरुण युवकांना सक्षम केलं जाईल.
– तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढला जाईल.
– योजनेंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.
– इंटर्नशिपचा कालावधी संपल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करावी?
– सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– http://sip.ncdc.in/
– नंतर वेबसाइटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
– वेबसाइटच्या मुख्यपानावर आपल्याला “ New Registration” या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
– त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
– पानावर आपल्याला एक फॉर्म दिसेल, त्याची लिंक खाली दिलेली आहे.
– http://sip.ncdc.in/Register.aspx
या फॉर्ममध्ये आपल्याला आपले नाव, ईमेल आयडी, डीओबी (जन्म तारीख), मोबाइल नंबर, सांकेतिक शब्द आदी माहिती त्या ठिकाणी टाकावी आणि “ Register” या बटणावर क्लिक करावे.
– अशा पद्धतीने सहकार मित्र योजना 2022 मधील आपली नोंदणी यशस्वी होईल.
– त्यानंतर आपल्याला यूजरआयडी व पासवर्ड देऊन वेबसाईटवर लॉग इन करता येईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

follow us