बीडमध्ये ‘ओबीसीं’चा एल्गार; जरांगेंच्या प्रत्युत्तरात महासभा, मुंडे बहिण-भावालाही निमंत्रण

बीडमध्ये ‘ओबीसीं’चा एल्गार; जरांगेंच्या प्रत्युत्तरात महासभा, मुंडे बहिण-भावालाही निमंत्रण

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांना या सभेतून ओबीसी नेते प्रत्युत्तर देणार असल्याचं बोललं जातं आहे.

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात दौरा करीत जाहीर सभा घेतल्या आहे. या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांमध्ये जनजागृती केली आहे. यासोबतच मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे सत्ताधारी सरकारलाही चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे.

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सहा महिन्यांची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजबांधवांचा समावेश झाल्यास ओबीसीच्या हाती काहीही लागणार नसल्याची भूमिका ओबीसी नेत्यांकडून मांडली जात आहेे. मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून मराठा -कुणबी, कुणबी-मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. आता याच नोंदीच्या आधारे सरसरकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरलीयं. मात्र, सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, या भूमिकेवर छगन भुजबळांनी बोट ठेवत कडाडून विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालं आहे. याचं मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात व्यक्तिगतपणे टीक-टिप्पणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता 10 महिने तळ ठोकणार, दादा असताना फक्त…; चाकणकरांचा कोल्हे अन् सुळेंना टोला

दरम्यान, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मात्र, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देऊ नये अशी भूमिका मांडत छगन भुजबळांनी विरोध केला आहे. या विरोधानंतर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जाहीर सभांच्या माध्यमताून एकेरी भाषेत उल्लेख करीत सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यभरात ओबीसींची वज्रमूठ बांधण्यास सुरुवात केली आहे.

याआधी छगन भुजबळ यांची जालन्यात जाहीर सभा पार पडली होती. या सभेतून छगन भुजबळांनीही एकेरी उल्लेख करीत मनोज जरांगेंचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसींची जाहीर महासभा बीड जिल्ह्यात पार पडणार आहे. या सभेचं निमंत्रण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेल नाही. त्यामुळे आता या महासभेतून ओबीसी नेते काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज