आता 10 महिने तळ ठोकणार, दादा असताना फक्त…; चाकणकरांचा कोल्हे अन् सुळेंना टोला

आता 10 महिने तळ ठोकणार, दादा असताना फक्त…; चाकणकरांचा कोल्हे अन् सुळेंना टोला

Rupali Chakankar : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. त्या म्हणाल्या की, काहींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये दहा महिने तळ ठोकावा लागणार आहे. दादा होते तोपर्यंत फक्त मतदान आणि निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

दादा होते तेव्हा फक्त मतदान आणि निकालाला यावं लागत होतं…

यावेळी चाकणकरांना खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या अजित पवारांवरील वक्तव्यांवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘अजित दादांना बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्याही बातम्यांना प्रसिद्ध मिळू शकत नाही. जे खासदार अजित दादांवर बोलत आहेत. त्या दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे. सध्या ते घेत असलेल्या अफाट आणि विराट मोर्चांमधील खुर्च्या रिकाम्या आहेत.’

IIT BHU विद्यार्थीनीचा विनयभंग : अटक होताच तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी

‘आता भावनिक राजकारण संपलेलं आहे. जनतेला विकासाचे राजकारण हवं आहे. त्यामुळे जे खासदार दादांवर बोलत आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये दहा महिने तळ ठोकावा लागणार आहे. याचा अर्थ दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी यावे लागत होतं. यावरूनच स्पष्ट होतं की, एखाद्या दादांमुळेच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी दादांवर बोलणं सोडून लोकांमध्ये जाऊन काम करावे. असा सल्ला रूपाली चाकणकर यांनी खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना दिला.

फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी अवतरले; तनपुरेंचा कर्डिलेंवर हल्लाबोल

तर यावेळी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, अजित दादाना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे. बारामती लोकसभेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज