फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी अवतरले; तनपुरेंचा कर्डिलेंवर हल्लाबोल
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली. याचा प्रत्यक्ष फटका हा विकासकामांना बसला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मंजूर कामांसाठी मोठे प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांचे काम राहुरी या आपल्या मतदार संघात सुरू झाले. परंतु, या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले आहे, असा टोला आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी नावं न घेता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांना लगावला.
लगीनघाई! नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे
राहुरी तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात राज्यात वेगाने विकास कामे झाली. कोरोना काळात निधींची कमतरता होती. मात्र याही परिस्थितीमध्ये मार्ग काढत निधी आणून मतदार संघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सरकारने अनेक अडथळे निर्माण केले. सुमारे 30 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली, अशा शब्दात तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कितीही अडवणुकीचे धोरण केले तरी आम्ही जनतेच्या न्यायालयात निश्चित यशस्वी होऊ व पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
साखर वाटप हा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
खासदार सुजय विखे हे सध्या नगर दक्षिण मतदार संघात साखर वाटप करत आहे. यावरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विखे यांच्यासह शिवाजी कर्डिलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर नाही, त्याकडे अधिक लक्ष देण्याऐवजी साखर वाटप करून लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. लोणीच्या पुढार्यांचे एक वेळेचे ठीक पण नगरच्या पुढाऱ्याचे साखर वाटपात काय काम असा टोला तनपुरेंनी लगावला. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून खुशाल हत्तीवरून साखर वाटावी असा चिमटा देखील तनपुरे यांनी काढला.
मंदिराचे राजकारण मत मिळवण्यासाठी
देशभरात चर्चेत असलेला व बहुप्रतिक्षित अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारी रोजी होणार आहे. मात्र सध्या यावरून देखील नेतेमंडळी निवडणुकांच्या अनुषंगाने आपली राजकीय गणित जुळवू लागली आहे,असा घणाघात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्यास परवानगी दिली. मात्र भारतीय जनता पक्ष केवळ राजकारण करून मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. कांदा, दूध, सोयाबीन, कापूस या पिकांना भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. मात्र, त्याकडे लक्ष न देता सत्ताधारी मतांची जुळवाजुळव करण्यात मश्गूल झाले आहेत. नगरचे पुढारी हिंदू समाजाची मते मिळवण्यासाठी बेगडी प्रेम दाखवत आहे. प्रभू श्रीरामाचे नाव घ्यायचे आणि वर्तन मात्र वेगळेचं करायचे, अशा शब्दात तनपुरे यांनी भाजपच्या नेत्यांवर शाब्दिक निशाणा साधला.