IIT BHU विद्यार्थीनीचा विनयभंग : अटक होताच तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी
IIT-BHU मधील विद्यार्थिनीवरील सामूहिक विनयभंग प्रकरणात तीन आरोपींची भारतीय जनता पक्षातून (BJP) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख हंसराज विश्वकर्मा (Hansraj Vishwakarma) यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल या तिन्ही आरोपींना काल (31 डिसेंबर) अटक केली. त्यानंतर हे तिघेही जण भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. (Three accused in IIT-BHU student gang-rape case expelled from Bhartiya Janata Party)
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल पांडे हा भाजनपच्या महानगर युनिटच्या आयटी सेलचा समन्वयक होता, तर सक्षम पटेल हा सह-संयोजक होता. आनंद चौहान हा कैंट विधानसभा मतदारसंघातील आयटी सेलचे समन्वयक होता. काही दिवसांपूर्वी काशी प्रांत अध्यक्ष दिलीप सिंग पटेल यांच्याकडेही सक्षम पटेल शांतता अधिकारी म्हणून काम करत होता. कुणाल पांडे आयटी सेलच्या सदस्यांची नियुक्ती करायचा. तर 2022 मध्ये आनंद चौहान याच्याविरुद्ध भेलूपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.
नवरा-बायकोत रस्सीखेच, तिसऱ्यानेच मारली बाजी : सर्वोच्च प्रशासकीयपदी ‘डॉ. नितीन करीर’ विराजमान
या निर्णयाबाबत बोलताना विश्वकर्मा म्हणाले, “निश्चितपणे त्यांची (आरोपी) नावे पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत, त्यामुळे चौकशीनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे”. भाजपने तिन्ही आरोपींपासून स्वतःला दूर केले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, “आरोपींपासून दूर ठेवण्याचा प्रश्न नाही. पण पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. सध्या तीन आरोपींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असून, पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईही केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
1 नोव्हेंबर 2023 रोजी, BHU IIT कॅम्पसमध्ये रात्री उशिरा तीन लोकांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग करत एक नग्न व्हिडिओ बनवला होता. यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर या प्रकरणातातील दोषींवर कलम 376 (डी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मुद्दा प्रियांका गांधी, अखिलेश यादव या सर्व बड्या विरोधी नेत्यांनीही उचलून धरला होता. घटनेच्या अवघ्या आठवडाभरानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी त्यात भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
‘चंद्रकांत पाटील असतील तर आरक्षण द्यायला ५० वर्षे लागतील’, मनोज जरांगेंचा खोचक टीका
घटनेच्या आठवडाभरातच सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समजले की आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आणि जेव्हा मी विरोधी पक्षनेता म्हणून आवाज उठवला तेव्हा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला. माझ्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तत्कालीन पोलीस ठाणे प्रमुख आणि एसीपी भेलुपूर यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा खूप दबाव होता. त्यामुळे इतके दिवस आरोपींना अटक झाली नाही. हा मुद्दा आम्ही सातत्याने मांडला, त्यामुळे दबावामुळे आरोपींना अटक करणे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले होते.