सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना (NCDC)

सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना (NCDC)

Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशची धडाकेबाज सुरुवात; अफगाणिस्तानचा दारुण पराभव

सहकार मित्र इंटर्नशिप योजना पात्रता :
– या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक असावा.
– योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण पूर्ण केले, तेदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्यासाठी कृषी, संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करु शकतात.

वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशची धडाकेबाज सुरुवात; अफगाणिस्तानचा दारुण पराभव

इंटर्नशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
वय प्रमाणपत्र
ईमेल आयडी
आधार कार्ड
मोबाइल नंबर

कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल?
– प्रकल्प व्यवस्थापन
– आयटी
– शेती व संबंधित क्षेत्र
– वित्त
– सहकार्य
– आंतरराष्ट्रीय व्यापार
– ग्रामीण विकास
– वनीकरण
– प्रकल्प व्यवस्थापन

योजनेंतर्गत कोणता लाभ मिळेल?
– देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
जाईल.
– या योजनेतून देशातील तरुण युवकांना सक्षम केलं जाईल.
– तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढला जाईल.
– योजनेंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.
– इंटर्नशिपचा कालावधी संपल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करावी?
– सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– http://sip.ncdc.in/
– नंतर वेबसाइटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
– वेबसाइटच्या मुख्यपानावर आपल्याला “ New Registration” या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
– त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
– पानावर आपल्याला एक फॉर्म दिसेल, त्याची लिंक खाली दिलेली आहे.
– http://sip.ncdc.in/Register.aspx
या फॉर्ममध्ये आपल्याला आपले नाव, ईमेल आयडी, डीओबी (जन्म तारीख), मोबाइल नंबर, सांकेतिक शब्द आदी माहिती त्या ठिकाणी टाकावी आणि “ Register” या बटणावर क्लिक करावे.
– अशा पद्धतीने सहकार मित्र योजना 2022 मधील आपली नोंदणी यशस्वी होईल.
– त्यानंतर आपल्याला यूजरआयडी व पासवर्ड देऊन वेबसाईटवर लॉग इन करता येईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube