Government Schemes : राज्यातील (Maharashtra)शेतकऱ्यांना (Farmer)आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे (Government of Maharashtra)’नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana)राबवली जात आहे. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.
Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते. त्याच धर्तीवर राज्य सरकाक देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळं आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येत आहेत. अर्थात प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळत आहेत.
भुसेंच्या हस्ते लोकार्पण होताच भुजबळ नाराज? छगन भुजबळांनी डाव सावरला
योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
– या योजनेसाठी इच्छुक शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
– या योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी अर्ज करु शकतील.
– शेतकऱ्यांकडे स्वता:च्या नावे शेतजमीन असावी.
– कृषी विभागात अर्जदाराची शेतकरी म्हणून नोंदणी असावी.
– शेतकऱ्यांच्या नावे बँकेत खाते असावे. ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– रहिवाशी दाखला.
– आधार कार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– बँक खात्याचा तपशील
– सातबारा दाखला
– पासपोर्ट साईज फोटो
– मोबाईल नंबर
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
– महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही.
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेणारा प्रत्येक शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आपोआप पात्र ठरतो.
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम येत आहे, त्याच खात्यात पाठवली जाते.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)