Govt Schemes : या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या योजनेद्वारे देशातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे.(govt schemes Pradhan Mantri Gati Shakti Yojana 100 lakh crore scheme)
राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का? शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट!
योजनेचे वैशिष्ट्य आणि फायदे
अत्याधुनिक नाविण्यपूर्ण आणि नवीन युगाच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याच्या गरजेवर भर दिले जाणार आहे.
100 लाख कोटी रुपयांच्या या नवीन उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
लघु आणि कुटीर उद्योगांचे उत्पादनही वाढेल.
योजनेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक भागात नागरिकांना सहजपणे जीवन जगता यावे यासाठी वाहतूक सुविधा, वीज सुविधा, 24 तास पाण्याची सोय आदी सुविधा पुरवल्या जातील.
स्ट्रीट फर्निचरमधील वस्तुंचे दर तुम्ही ठरवले का? आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना थेट सवाल
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?
1 अर्जदार देशाचा रहिवासी असावा.
2 देशातील 18 ते 60 वयोगटातील नागरिकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल.
3. देशातील बेरोजगार तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पात्र असेल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– बॅंक खाते पासबुक
– पासपोर्ट आकाराचे फोटो
– इमेल आयडी
– जात प्रमाणपत्र
– मोबाईल नंबर
– आधार कार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– रेशन कार्ड
– वयाचा पुरावा
टीप : वरील योजनेच्या नियमांमध्ये किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीसाठी सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करुन घ्यावी.