राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का? शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट!

Uddhav Thackeray and Raj Thackeray

Mumbai News : राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. आताशा या चर्चा वाढीस लागल्या आहेत. विविध शहरांत कार्यकर्त्यांकडून तसे फलकही लावण्यात आले होते. यावर दोन्ही बाजूंनी मात्र काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. यावर आता शिवसेना नेते किरण पावसकर यांनी भाष्य केले आहे.

पावसकर म्हणाले, एकत्र येण्याबाबत दोन्ही नेतेच निर्णय घेतील. हा कौटुंबिक विषय आहे. राज ठाकरे सक्षम आहेत. त्यांना आधीचा अनुभव आहे. कधी कोणाला टाळी द्यायची, टाळी द्यायची नाही. कारण अनेकदा टाळीसाठी हात पुढे आले आणि दुसरीकडे गेले. यात आता उद्धव ठाकरेंचे काहीच नाही. टाळी द्यायची की नाही हे राज ठाकरेच ठरवतील. दोघांनी एकत्र यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. पण, दोघांनी एकत्र येऊ या म्हणतील आणि उद्धव ठाकरे दुसऱ्याच कुणाशी युती करतील. त्यांच्याबाबत काहीच सांगता येत नाही, असा खोचक टोला पावसकर यांनी लगावला.

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

दरम्यान, याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. जुलै महिन्यात ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं हा प्रश्न गेल्या 22 वर्षांपासून विचारला जात आहे. वारंवार विचारला जात आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत ज्या प्रकारची हुकूमशाही या देशात चालू आहे. दडपशाही सुरू आहे. पैशाचं राजकारण केलं जात आहे ही जी महाराष्ट्राची ओळख काढायची असेल तर सर्व घटकांनी एकत्र यावं या मताची मी आहे, असे राऊत म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube