Graphic Designer Kamlesh Kamtekar : देशात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीमुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कधी नोकरी गमवावी लागेल याचा आता कोणालाच नेम राहिलेला नाही. अशी एक घटना सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. एका व्हायरल पोस्टनुसार मुबई रहाणारा आणि 14 वर्षांचा अनुभव असलेला ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) कमलेश कामतेकरची (Kamlesh Kamtekar) नोकरी गेल्याने शेवटी पोटासाठी त्याने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
2024 च्या सुरुवातीला कंपनीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने 14 वर्षांचा अनुभव असून देखील कमलेशला आपली नोकरी गमावावी लागली. अचानक नोकरी गेल्याने कमलेशने पुन्हा एकदा नोकरी मिळवा यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र कमलेशला नोकरी मिळाली नाही. पाच महिने बेरोजगार राहिल्यानंतर शेवटी कमलेशने ऑटो-रिक्षा चालक (Auto Driver) म्हणून एक नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्याने लिंक्डइनवरील (LinkedIn) एका पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, कंपनीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने माझी नोकरी गेली. ग्राफिक डिझाईनमधील 14 वर्षांचा अनुभव असलेले असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजरची नोकरी गमावल्यानंतर मी अनेक ठिकाणी नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र 5 महिने झाले तरीही मला नवीन नोकरी मिळाली नाही.
मी नोकरीसाठी लिंक्डइनवर देखील अर्ज केला होता मात्र हवं तसं ऑफर मिळाला नाही. त्यामुळे मित्रांनी मला कमी पगारमध्ये काम करण्याचे सुचवले मात्र तरीही देखील काम मिळाला नाही. शेवटी, उदरनिर्वाह करण्यासाठी मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि ऑटो रिक्षा चालक म्हणून नवीन प्रवासाची सुरुवात केली. असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कमी पगारात दुसऱ्या ठिकाणी काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करून पैसे कमवण्यासाठी निर्णय घेतला असं देखील त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
‘निर्दोष आहात, तर… ‘ कराडच्या सरेंडरनंतर खासदार सोनवणे भडकले
तर दुसरीकडे या पोस्टवर अनेक कमेंट देखील येत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, अभिनंदन, तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. तुमची कौशल्ये आणि तुमचा योग्यवेळ कंपनीसाठी का वापरायचा? तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाली असती पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुम्हाला खूप शुभेच्छा.