स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? आमदार रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? आमदार रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Maharashtra Local Body Election Update : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पुन्हा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) केव्हा होणार, याचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वच स्थानिक नेते या निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या एका आमदाराने सोशल मीडिया पोस्ट करत या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम…हा खूप मोठा आशीर्वाद; आयुष्मान खुराना

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली होती. न्यायालयाने सुनावणीत म्हटलं होतं की, निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंधांसंदर्भात समाधानकारक कारण नसेल, तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात (Maharashtra Politics) येतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु अशातच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची सोशल मिडिया पोस्ट जास्तच चर्चेत आली आहे.

चित्रा वाघ यांनी राऊतांचं मानसिक संतुलन काढलं; म्हणाल्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय…

रोहित पवार यांनी म्हटलंय की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही निर्माण होत असून लोकाभिमुख विकासाची चाके थांबली आहेत. अशी स्थिती असताना सरकार मात्र अद्यापही निवडणुका पुढे ढकलत आहे, हे योग्य नाही. निवडणुकीची सत्ताधारी पक्षाला एवढी भीती का वाटतेय? केवळ संविधान आणि लोकशाहीचं नाव न घेता सरकारने तत्काळ निवडणुका घोषित करून लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान करावा.

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, आणि नगरपालिकेच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षण या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यासंदर्भात संकेत दिलेत. तर आमदार रोहित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याचं म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube