“मी पुन्हा येईल” असं तुम्ही म्हणाला नव्हता, तरी परत आलात; CM फडणवीसांनी केलं नार्वेकरांचं अभिनंदन
CM Fadnavis Reaction After Rahul Narvekar Elected As Assembly Speaker : राज्यात आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीय. यावेळी बिनविरोध, एकमताने नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राहुल नार्वेकरांचं कौतुक केलंय.
राहुल नार्वेकर यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आजवर केवळ चारच लोकांना मिळाला आहे. याच्यामध्ये कुंदनलाल फिरोदिया, सयाजी सिलम, बाळासाहेब भारदे आणि राहुल नार्वेकर (Assembly Speaker) आहे. कुंदनलाल फिरोदिया, सयाजी सिलम हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. तर बाळासाहेब भारदे यांनी एका लोकप्रतिनिधीने कसं कामं करावं, याचं उत्तम उदाहरण दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी राऊतांचं मानसिक संतुलन काढलं; म्हणाल्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय…
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्ष महोदय, “मी पुन्हा येईल” असं तुम्ही म्हणाला नव्हता. तरी तुम्ही परत आलात. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही खुर्चीला न्याय देण्याचे काम कराल, असं देखील ते म्हणाले (Maharashtra Politics) आहेत. नाना भाऊ तुम्ही वाट मोकळी केली म्हणून नार्वेकर यांना संधी मिळाली, असा फडणवीसांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सहमती दिली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या फेरनिवडीबद्दल अनुमोदन दिलं. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांनी काल अर्ज दाखल केला होता. अजून कोणाचाच अर्ज न आल्याने नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यावेळी नार्वेकरांना उद्देशून म्हणाले की, पाच वर्षाच्या काळात संपूर्ण मीडियाचं तुमच्याकडे लक्ष होतं. राहुल नार्वेकर हे एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सभागृहाचे काम, नियमांचा चांगला अभ्यास आहे.