Download App

मुलांना झटका पालकांना चिंता! अपस्माराची माहिती घ्या अन् सावध राहा..

मेडिकल जर्नल लॅन्सेटचा एक अहवाल सांगतो की भारतात मिरगी (अपस्मार) आजाराचे साधारण 1.2 कोटी रुग्ण आहे.

Epilepsy in Children : मेडिकल जर्नल लॅन्सेटचा एक अहवाल सांगतो की भारतात मिरगी (अपस्मार) आजाराचे साधारण 1.2 कोटी रुग्ण आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. काही प्रकरणात तर हा आजार जन्मजात असतो. जन्मतः च मुले या आजाराने ग्रस्त होतात. अशा प्रकरणात सुरुवातीच्या काही वर्षात या आजाराची माहिती होत नाही. परंतु नंतर मूल मोठे झाल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी पालक प्रचंड घाबरून जातात आणि हा काहीतरी वेगळाच आजार आहे असे समजतात. ग्रामीण भागात तर या आजाराला भूत प्रेताशी जोडून पाहिले जाते. पण असे काहीच नसते.

अपस्मार आजार जन्मजात का होऊन जातो यामागे काही कारणे आहेत. हा आजार नेमका काय आहे याची पालकांना माहिती असणे गरजेचे आहे. याबाबतीत जीबी पंत रुग्णालयातील न्युरोसर्जरी विभागातील विभागप्रमुख डॉ. दलजीत सिंह म्हणतात एपिलेप्सी (अपस्मार) एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये मेंदूच्या पेशीत असामान्य हालचाली होतात. ज्या लोकांना हा आजार होतो त्यांना अचानक बेशुद्ध होणे, मांस पेशींमध्ये ओढाताण, श्वास घेण्यात अडचणीसह झटके येतात. अपस्मार बहुदा जन्मजात असतो. यामागे महत्वाचे कारण म्हणजे आईकडून आजार मुलांना येणे म्हणजेच जेनेटिक आहे. यासह अन्य काही कारणे देखील यामागे आहेत.

विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?

जन्मतः च अपस्मार का होतो

जन्माच्या वेळी मेंदूला काही दुखापत होणे किंवा ऑक्सिजनची कमतरता यामुळे हा आजार होऊ शकतो. गर्भधारणेच्या काळात महिलेला इन्फेक्शन झालेले असेल त्यावेळी देखील तिच्या होणाऱ्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता जास्त राहते. जन्माच्या वेळी मेंदूच्या विकासाशी संबंधित समस्या असतील त्यामुळे देखील हा आजार होण्याची शक्यता राहते. काळजीची बाब म्हणजे सुरुवातीच्या काही काळात या आजाराची माहिती मिळत नाही. जर अपस्मार अनुवंशिक कारणांनी होत असेल तर त्याला रोखता येऊ शकत नाही. परंतु प्रेग्नंसीच्या वेळी संक्रमण किंवा अन्य काही कारणांमुळे हा आजार झाला असेल तर यापासून बचाव करता येऊ शकतो.

या आजारावर उपचार काय

या आजाराला समूळ नष्ट करता येणे अशक्य आहे पण औषधांच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच सर्जरी करूनही या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. एपिलेप्सीचा नेमका कोणता प्रकार आहे हे समजण्यासाठी डॉक्टरांना एमआरआय, ईईजी आणि व्हिडिओ ईईजी मॉनिटरींगची गरज जाणवते.

अपस्माराचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. यामध्ये फिट किंवा झटका आल्यानंतर मेंदूचा कोणता भाग किती प्रभावित झाला आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अचानक शुद्ध किंवा भान हरपणे, शरीर घट्ट होणे (जनरलाइज्ड टॉनिक सिझर्स), शरीराची विचित्र हालचाल भान हरपता किंवा न हरपता शरीराची थरथर (कॉम्प्लेक्स फोकल सिझर्स), काही वेळेस वेगळा आभास होणे (सिंपल फोकल सिझर्स) आणि शून्यात टक लावून पाहणे (अबसेन्स/डायलेप्टिक सिझर) असे प्रकार आढळून येतात.

follow us