विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?

विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?

E Insurance Account : एखादी विमा पॉलिसी खरेदी करणे सोपे असते पण विमा कागदपत्रे सांभाळणं जिकिरीचं ठरतं. फक्त पॉलिसी डॉक्युमेंट्सच नाही तर रिन्यू डेट लक्षात ठेवणे, क्लेम प्रोसेस करणे अनेकदा त्रासदायक ठरते. याच अडचणी कमी करण्यासाठी ई इन्शुरन्स अकाउंटची (E Insurance Account) सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या डिजिटल खात्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सर्व विमा पॉलिसी (Insurance Policy) एकाच ठिकाणी मॅनेज करू शकता.

काय आहे ई इन्शुरन्स अकाउंट

ई इन्शुरन्स अकाउंट एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जिथे सर्व विमा पॉलिसी सुरक्षित ठेवता येतात. या खात्याला विमा रीपॉजीटरी ऑपरेट करते. याला विमा रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची (IRDA) मान्यता मिळालेली आहे. यामुळे विमाधारकांना त्यांची पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे जवळ बाळगण्याची काहीच गरज राहत नाही.

ई इन्शुरन्स अकाउंटचे फायदे काय

तुम्हाला वेगवेगळे पॉलिसी डॉक्युमेंट्स सांभाळण्याची गरज राहत नाही.
विमा अकाउंट नंबर आणि पत्ता यांसारखी माहिती एकदा अपडेट केल्यानंतर ही माहिती सर्व पॉलिसीत आपोआप अपडेट होईल.
डिजिटल पॉलिसी असल्याने क्लेम दाखल करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे खूप सोपे होते.
विमा पॉलिसी नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला रिमाइंडर करून दिले जाईल. यासाठी तुम्हाला तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही.
पॉलिसी खरेदी करणे आणि हस्तांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. यामुळे पेपर वर्कची काहीच गरज राहणार नाही.

म्युच्युअल फंड स्विच करताय? मग आधी फायदे अन् तोट्याचं गणित समजून घ्या..

ई इन्शुरन्स अकाउंट कसे उघडाल

ई इन्शुरन्स अकाउंट सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एखाद्या अधिकृत विमा रीपॉजिटरीमध्ये नोंदणी करावी लागेल. कोणत्याही अधिकृत रीपॉजिटरीच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल.

अर्ज कसा कराल

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर अर्ज भरून केवायसी डॉक्युमेंट्ससह विमा कंपनीत जमा करा. ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर रीपॉजिटरीच्या वेबसाइटवर ई केवायसीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करू शकता.

यानंतर तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. एसएमएस किंवा इमेलच्या माध्यमातून माहिती मिळेल.

पॉलिसी जोडण्याचा पर्याय

लॉग इन केल्यानंतर तुमच्याजवळ लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि मोटार इन्शुरन्स जोडण्याचा पर्याय मिळेल. जर तुमच्याकडे जुनी पॉलिसी असेल तर तर तुम्ही त्यांचा कनवर्जन फॉर्म भरून हा अर्ज स्कॅन करून अपलोड करू शकता.

म्युच्यूअल फंड ‘एसआयपी’त भूकंप! जानेवारीत तब्बल 61 लाख लोकांच्या गुंतवणुकीला ब्रेक; कारण काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube