Download App

कोरोनाच्या लाटेत वाढला होता ‘हा’ घातक आजार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.

Corona Update : अमेरिकेच्या अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनच्या शोधकर्त्यांनी नुकताच एक रिसर्च केला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती. जेव्हा रक्तात फॅटचे प्रमाण जास्त वाढते तेव्हा या स्थितीला डीस्लीपिडेमिया असे म्हणतात. जवळपास दोन लाख लोकांच्या सहभागाने हा रिसर्च करण्यात आला होता. यामध्ये हा आजार वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या लोकांना मधुमेह आणि लठ्ठपणाची (Obesity) समस्या होती त्या लोकांमध्ये या आजाराचा फैलाव जास्त होता.

कोरोना महामारीच्या तीन वर्षांच्या (२०२० ते २०२२) काळात लोकांच्या रक्तात फटचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधकांना आढळून आले होते. कोरोनाच्या आधीच्या काळाची तुलना करता हे प्रमाण ३० टक्क्यांनी जास्त होते.

Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेसाठी कुणासोबत जाणार?, प्रचार सुरू असतानाच फडणवीसांचं मोठ वक्तव्य

द जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की कोविड १९ च्या दरम्यान प्री कोविड १९ त्रैवार्षिक कालावधीच्या तुलनेत डीस्लीपिडेमिया विकसित होण्याचा धोका २९ टक्के जास्त होता. हा आजार वाढण्यामागे मुख्य कारण कोरोना महामारी आहे असा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला. पण या आजाराचा आणि कोरोनाचा काय संबंध आहे याचा स्पष्ट खुलासा यामध्ये करण्यात आला नाही. या आजारामुळे रक्तात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचा धोका वाढतो. हा आजार हार्ट डीसीज, स्ट्रोक, कार्डीओवस्क्यूलर समस्यांचे कारण बनते.

डीस्लीपिडेमिया आजार नेमका काय

जेव्हा रक्तात फॅटचे प्रमाण जास्त होते त्या स्थितीला डीस्लीपिडेमिया असे म्हणतात. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील वाढते. यामुळे हृदय विकाराचा धोका देखील वाढतो. कोरोनानंतर हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याचे एक कारण डीस्लीपिडेमिया देखील आहे. परंतु याचे काही ठोस पुरावे नाहीत. तरी देखील संशोधकांनी सांगितले आहे की लोकांनी आरोग्याची काळजी घेत लिपिड लेव्हलची नियमित करावी. यामध्ये निष्काळजीपणा करू नका.

कोविडमुळे उच्च रक्तदाबाची समस्या

या टीमच्या शोधकर्त्यानी याआधीही एक रिसर्च केला होता. यामध्ये असे दिसून आले होते की कोरोनामुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि टाईप 2 मधुमेहाची (Diabetes) प्रकरणे वाढली होती. आता ताज्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की कोरोना महामारी डीस्लीपिडेमिया आजाराचा वाढत्या प्रकरणांचे कारण ठरू शकतो.

कोरोनापेक्षाही ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

follow us