World Pneumonia Day 2024 : वातावरणात आता थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. या थंडीच्या आगमनाबरोबरच घरोघर सर्दी, खोकला आणि श्वसनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. हवामानात बदलामुळे ही समस्या अगदी सामान्य आहे. परंतु दीर्घ काळापासून या समस्या जाणवत असतील तर सावध व्हा. कारण काही वेळेस श्वसना संबंधीची समस्या निमोनियामुळे (World Pneumonia Day) देखील होऊ शकते. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
निमोनिया म्हणजे एक प्रकारे फूफुसांचे संक्रमण असते. जे खोकला, शिंक किंवा किटाणू युक्त हवेत श्वास घेतल्याने फैलावते. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांत ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. अनेकदा तर यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानेच दरवर्षी जागतिक निमोनिया दिन पाळला जातो. आज या निमित्ताने निमोनीयाचे लक्षण, बचाव आणि या आजाराच्या प्रतिबंधासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊ या..
बापरे! 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या आहारी; जाणून घ्या, वाढत्या आजाराची कारणे
नीमोनिया एक प्रकारचे संक्रमण आहे. ज्यामध्ये फुप्फुसांतील हवेच्या पिशव्यांना सूज येते. काही वेळेस यामध्ये पू देखील होतो. यामुळे कफ, ताप, थंडी वाजून येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. निमोनिया साधारणपणे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा कवक सारख्या जिवाणूंमुळे निमोनियाचा धोका असतो. लहान मुले आणि 65 वर्षांवरील कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया, व्हेंटिलेटर संबंधित निमोनिया, बॅक्टेरियल निमोनिया,व्हायरल निमोनिया,मासकोप्लाझ्मा निमोनिया, बुरशीजन्य निमोनिया, अॅटिपिकल निमोनिया इत्यादी प्रकारचे निमोनिया आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निमोनिया कुणालाही होऊ शकतो. परंतु काही परिस्थितीत या आजाराचा धोका जास्त वाढतो. रुग्णालयात आयसीयुमधील रुग्ण जर व्हेंटिलेटरवर असेल तर त्याला निमोनिया होण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त दमा, क्रॉनिक, ओबस्ट्रॅक्टीव्ह पल्मोनरी डिसिज किंवा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनाही या आजाराचा धोका जास्त असतो. अभ्यासकांचे म्हणणे आहे की धूम्रपान सुद्धा निमोनिया उत्पन्न करणाऱ्या बॅक्टेरिया आणि व्हायरस विरोधातील शरीराच्या नैसर्गिक सुरक्षा प्रणालीला नुकसानदायक ठरू शकतो.
श्वास घेताना किंवा खोकताना छातीत वेदना होणे
खोकल्याबरोबर खूप जास्त प्रमाणात कफ येणे
थकवा, ताप, घाम आणि अंगात हुडहुडी भरल्यासारखे वाटणे
उलटी होणे, जुलाबाची समस्या निर्माण होणे
सावधान! कुणालाही होऊ शकतो कॅन्सर; काळजी घ्या, ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवाच..
सर्दी खोकला निमोनियाची प्रमुख कारणे आहेत परंतु निमोनिया आहे किंवा नाही हे कसे समजणार. यासाठी सामान्य सर्दी आणि फ्लू च्या उलट निमोनिया फुप्फुसांशी संबंधित समस्या निर्माण करतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. सामान्य सर्दी किंवा पडसे झाले असेल तर काहीही इलाज न करता तीन ते चार दिवसांत आराम मिळतो. परंतु निमोनियात दर्जेदार उपचार आणि अँटीबायोटिक्सची गरज असते. वेळेवर उपचार केला नाही तर संक्रमणाचा धोका वाढतो. साधी सर्दी झाली असेल तर कफ किंवा श्वास घेण्यास फार त्रास होत नाही. पण निमोनियात हा त्रास खूप वाढतो. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.