सावधान! कुणालाही होऊ शकतो कॅन्सर; काळजी घ्या, ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवाच..

सावधान! कुणालाही होऊ शकतो कॅन्सर; काळजी घ्या, ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवाच..

National Cancer Awareness Day 2024 : दरवर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी कॅन्सर या घातक आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा केला (National Cancer Awareness Day) जातो. कर्करोग कशामुळे होतो? या आजाराची लक्षणे काय आहेत? कॅन्सरवरील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम आयोजित केले जातात. हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पहिल्यांदा हा दिवस जाहीर केला होता. तेव्हापासून नियमितपणे कॅन्सर जनजागृती दिवस साजरा केला जात आहे.

कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिओथेरपी विकसित करणाऱ्या मेरी क्युरी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (World Health Orgnization) कॅन्सर हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये फूप्फसाचा कर्करोग, कोलन कर्करोग, पोटाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग प्रमुख आहेत. यांमुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. प्रोस्टेट कर्करोग हा त्वचेच्या कर्करोगा व्यतिरिक्त सामान्य कर्करोगापैकी एक आहे.

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की आपली रोजची दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या झाल्या आहेत. यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर याबाबत सर्व लोकांना माहिती दिली गेली तर या आजारापासून संरक्षण करणे आणखी सोपे होईल. चला तर मग कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होतो हे माहिती करून घेऊ..

मनीषा कोइरालाने केली कॅन्सरवर मात; द प्रिन्सेस ऑफ वेल्सने दिल्या शुभेच्छा, पत्रात म्हणाली 

कॅन्सरचा धोका

कॅन्सर रोग तज्ज्ञ म्हणतात आपण जर आपली लाईफस्टाईल व्यवस्थित केली तरी कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी केला जाऊ शकतो. काही अभ्यासातून समोर आले आहे की वाढत्या वयाबरोबर कॅन्सरचा धोका (Cancer) देखील वाढत जातो. परंतु आता अगदी लहान वयात देखील कॅन्सर होत आहे. याव्यतिरिक्त जीवनशैलीच्या कारणांमुळे जसे की स्मोकींग, जास्त वजन, आहाराच्या चुकीच्या पद्धती, शारीरिक निष्क्रियता यांमुळे देखील कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

तंबाखू आणि मद्यपान

धूम्रपानास कॅन्सरचे प्रमुख कारण मानले जाते. फुप्फुसांच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या ८० ते ९० टक्के मृत्युंमागे धूम्रपान कारण आहे. तंबाखूच्या धुरात कार्सिनोजेन्स असतात ज्यामुळे पेशींतील डीएनएला नुकसान करतात. नियमित मद्यपान करत असल्यास काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. यामध्ये लिव्हर, कोलोरेक्टल कॅन्सर यांचा समावेश आहे.

आहारात गडबड

काही प्रकारच्या आजारांमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे काही अभ्यासातून समोर आले आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्यास शरीरात सूज येते. यामुळे कॅन्सरसह अन्य आजार होण्याचा धोका राहतो. प्रोसेस फूड खाल्ल्यानं देखील शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता असते.

शारीरिक हालचाली करा

शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहे. व्यायाम करत नसाल किंवा तासनतास शरीराची हालचालच करत नसाल तर कर्करोग होण्याची शक्यता असते. शारीरिक हालचाली अभावी वजन वाढण्याची शक्यता असते. जास्त वजन अथवा लठ्ठपणा कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो.

कॅन्सर टाळण्यासाठी काय कराल

तंबाखूच्या सेवनाने कॅन्सर होऊ शकतो. तेव्हा तुम्ही जर तंबाखू सेवन करत असाल तर ही सवय आधी बंद करा.
तंबाखू चघळण्याचा संबंध तोंड आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी जोडलेला आहे.
धूम्रपान फुफ्फुस, तोंड, घसा, मूत्राशय, गर्भाशयासह विविध प्रकारच्या कर्करोगाशी जोडलेले आहे. त्यामुळे धूम्रपान टाळा
धूम्रपानामुळे दुसऱ्या व्यक्तीला देखील त्रास होतो या गोष्टीची काळजी घेऊन स्मोकिंग तत्काळ बंद करा.

प्रदूषणामुळे होऊ शकतो ‘आय स्ट्रोक’ जाणून घ्या, डोळ्यांचा आजार किती धोकादायक?

(टीप : ही माहिती फक्त सामान्य माहितीच्या आधारावर दिली आहे, अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube