Text Neck Syndrome : आजच्या डिजीटल युगात स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरशिवाय कोणतंच काम होत नाही. या दोन्ही साधनांचा वापर प्रचंड वाढला आहे. ऑफीसमध्ये तासनतास लॅपटॉपवर काम आणि नंतर घरी तासनतास मोबाइलची स्क्रिन (Mobile Screen) डोळ्यांसमोर असते. बऱ्याचदा ऑफिसची कामं मोबाइलवरही करावी लागतात. यासाठी कितीतरी वेळ मान पाठ न हलवता एकाच पोस्चरमध्ये बसावं लागतं. यामुळे शरीराची हानी होत आहे. परंतु, याकडे लक्ष द्यायला वेळ कुणालाच नाही. मोबाइलचा जास्त प्रमाणातील वापर मान आणि पाठीच्या कण्याच्या समस्यांना आमंत्रण देत आहे. यातील एक समस्या म्हणजे “टेक्स्ट नेक”
टेक्स्ट नेक (Text Neck) हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेऊ या..
टेक्स्ट नेक एक मॉडर्न हेल्थ प्रॉब्लेम आहे. मोबाइल आणि कॉम्प्यूटरच्या दीर्घ काळ वापराने ही समस्या निर्माण होते. या आजाराला उत्पन्न होण्यापासून रोखणे खूप गरजेचे आहे. यासाठी नक्की काय करता येईल हेच समजून घेऊ
तुम्ही जर तासनतास मान झुकवून मोबाइल फोन किंवा अन्य उपकरणाचा वापर करत असाल तर तुमच्या मानेवर जास्त दबाव येतो. यामुळे मान आणि पाठीच्या कण्यातील हाडांत वेदना होतात. अन्य समस्याही निर्माण होतात.
ज्यावेळी आपण उभे राहतो त्यावेळी आपल्या डोक्याचा भार मानेच्या एकाच हिश्श्यावर पडत नाही आणि पोश्चच संतुलित राहते. पण ज्यावेळी मान झुकवतो त्यावेळी मानेवर जास्त दबाव पडतो. हा अतिरिक्त दबाव मांसपेशी, लिगामेंट्स आणि डिस्कवर नकारात्मक परिणाम करतो. यामुळे मानेत वेदना आणि अन्य त्रास सुरू होतात. यालाच टेक्स्ट नेक म्हटले जाते.
मानेत वेदना, खांदे आणि पाठीच्या वरच्या भागात वेदना, डोकेदुखी, हात आणि खांद्यात मुंग्या येणे किंवा सुन्न पडणे, पाठीच्या कण्यातील हाडे वळणे, पोश्चर खराब होणे अशी लक्षणे यात आढळून येतात.
जर तुम्ही दीर्घकाळ मोबाइल किंवा कॉम्प्यूटरचा वापर करत असाल तर काही गोष्टी नक्कीच फॉलो करा.
Parenting Tips : मुलांना जेवू घालताना ‘या’ गोष्टी टाळाच; मुले राहतील फ्रेश अन् हेल्दी
मोबाइल आणि कॉम्प्यूटरचा वापर करताना मान सरळ ठेवा.
डिव्हाइस तुमच्या डोळ्यांच्या पातळीवर ठेवा जेणेकरून मान झुकवावी लागणार नाही.
खुर्चीवर बसताना पाठ सरळ ठेवा आणि खांद्यांना आराम द्या.
दर तीस ते चाळीस मिनिटांनी पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घेत राहा.
या काळात मान आणि खांद्यांना हलकेच स्ट्रेच करा. याकाळात थोडा व्यायाम केला तरी चालेल जसे की हळूहळू मान डाव्या उजव्या बाजूला आणि वर खाली फिरवा.
खाद्यांना वर खाली करून स्ट्रेच द्या.
जरुरी असेल त्याचवेळी मोबाइलचा वापर करा.
व्हॉईस मेसेज किंवा हँड्स फ्री डिव्हाइसचा वापर करा.
लॅपटॉप स्टँड किंवा फोन होल्डरचा वापर करा.
आरामदायक खुर्ची आणि डेस्कची निवड करा.