Parenting Tips : मुलांना जेवू घालताना ‘या’ गोष्टी टाळाच; मुले राहतील फ्रेश अन् हेल्दी

Parenting Tips : मुलांना जेवू घालताना ‘या’ गोष्टी टाळाच; मुले राहतील फ्रेश अन् हेल्दी

Parenting Tips : आजच्या वातावरणात अनेक प्रकारचे व्हायरस पसरलेले आहेत. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पालक मुलांची जास्त काळजी घेताना (Parenting Tips) दिसतात. मुलांना जास्तीत जास्त पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतात. पण मुलांना अतिप्रमाणात खाऊ घालणं सुद्धा त्रासदायक ठरू शकतं. मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होण्याची (Children Health) शक्यता असते.

तज्ञांनुसार मुलांसाठी चांगले करण्याच्या त्यांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात आई वडील मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ घालतात. जर मुलांना प्रमाणापेक्षा जास्त खाऊ घालत असाल तर ते अन्न कितीही पौष्टिक असले तरी मुलांना नुकसानदायक ठरू शकते.

एका रिसर्चनुसार एक तृतीयांशापेक्षा जास्त पालक मुलांना त्यांच्या ताटातील प्रत्येक गोष्ट खाण्याचा आग्रह करतात. पण खरा प्रश्न असा आहे की यासाठी मुलांवर जोर दिला पाहिजे का? आहार तज्ञांचे म्हणणे आहे की पालकांच्या या सवयीमुळे मुलांमध्ये भूक आणि पोट भरलेले असण्याचे संकेत ओळखणे कठीण होऊन जाते. अशात अती खाण्याच्या सवयीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची (Obesity) समस्या निर्माण होण्याचा धोका राहतो. तसेच अन्य गंभीर आजार होण्याची शक्यता बळावते.

कडाक्याचा उन्हाळा डोळ्यांना सांभाळा; जाणून घ्या खास टिप्स, डोळे राहतील सेफ!

या सर्व व्याधी ओव्हर पॅरेंटिंगमुळे उद्भवतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे याची माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात काही टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना हेल्दी ठेऊ शकता.

आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुलांना त्यांच्या पोटाचे संकेत समजू द्यायला हवेत. जेणेकरून मुले त्यांच्या शरीराच्या दुसऱ्या हिशोबाने खाऊ शकतील. जोपर्यंत पोट भरले असे वाटत नाही तोपर्यंत खाल्ले पाहिजे ही गोष्ट पालक मुलांना सांगू शकतील. काही वेळेस मुलाचे पोट भरले असेल पण त्याच्या ताटात अन्न शिल्लक असेल तर ते राहिलेले अन्न खाण्याचा आग्रह पालकांनी करू नये.

भोजनावेळी वातावरण प्रसन्न ठेवा

ज्यावेळी तुम्ही मुलांना खाऊ घालत असाल त्यावेळी घरातील वातावरण तणाव मुक्त आणि प्रसन्न राहील याची काळजी घ्या. ताटातील सगळे अन्न खाण्यासाठी जर तुम्ही मुलांना जबरदस्ती कराल तर मुलांना तणाव जाणवू शकतो. स्ट्रेसमुळेच नंतर मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या समस्या निर्माण होतात.

मुलांना त्यांची चॉइस जपू द्या

आहार तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्याच्या बाबतीत पालकांचे लक्ष असलेच पाहिजे. मुलांना सकस आहार मिळेल याची काळजी पालकांनी घेतलीच पाहिजे. पण यासाठी काही गोष्टी मुलांच्याही कलाने घेतल्या पाहिजेत. आपल्याला किती भूक आहे आणि किती अन्न खाल्ले पाहिजे हे मुलांना ठरवू दिले पाहिजे. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात मुलांना आई वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज पडतेच. पण यामुळे मुलांना हेल्दी इटिंग पॅटर्न तयार करण्यात मदत मिळेल.

रात्रीच्या वेळी आंबा खाताय? लगेच बंद करा, अन्यथा मोठा धोका…

जबाबदारी वाटून घ्या

मुलांचे पालक त्यांच्या हिशोबाने हेल्दी फूड खरेदी करतात आणि मुलांना खाऊ घालतात. पण मुलांना सुद्धा या गोष्टी ठरवता आल्या पाहिजेत. त्यामुळे जबाबदारी वाटून घ्या. जर मुल जास्त खात नसेल तर पुढील जेवणापर्यंत वाट पहा. तसेच टिव्ही आणि मोबाईल सारख्या सर्व वस्तूंपासून मुलांना शक्यतो दूर ठेवा. जेवण करतेवेळी या गोष्टी शक्यतो मुलांना देऊ नका.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube