द लॅन्सेटने अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या धोक्यांवर प्रकाश टाकणाऱ्या तीन (Report) अभ्यासांची मालिका प्रकाशित केली आहे . या पदार्थांना विविध प्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे , ज्यामुळे लोक पारंपारिकपणे तयार केलेलं अन्न टाळत आहेत अस या तज्ञांचं म्हणणे आहे. या प्रकारच्या खाण्याच्या सवयी कमी करणं वैयक्तिक पातळीवर शक्य नाही. ते सार्वजनिक जागृती मोहीमेतून करणं आवश्यक आहे.
इन्स्टंट नूडल्सपासून ते पॅकेज्ड स्नॅक्स आणि रेडी टू इट जेवणापर्यंत, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ हे आधुनिक जीवनाचा दैनंदिन भाग बनले आहेत. परंतु, हे सोयीस्कर पर्याय आपल्या स्वयंपाकघरांवर कब्जा करत असताना, धान्य, ताजी फळे-भाजा आणि घरगुती पाककृतींनी समृद्ध असलेले पारंपारिक आहार हळूहळू लुप्त होत चालले आहेत.
भारतात पहिले गृहकर्ज कोणी घेतले? कर्ज म्हणून किती मिळाली होती रक्कम? वाचा रंजक माहिती
तज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, आहार सुधारणं केवळ ग्राहकांच्या वर्तनात बदल करण्यावर अवलंबून नाही तर अल्ट्रा- प्रोसेस्ड फूडचे उत्पादन, त्याची विक्री आणि वापर कमी करण्यासाठी नवीन धोरणे विकसित करण्यावर देखील अवलंबून आहे . हे पॅकेज केलेले अन्न आहेत जे त्यांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी विविध रसायनांनी प्रक्रिया केले जातात, आणि हाच सर्वात मोठा जीवाला धोका आहे.
या प्रकारच्या अन्नपदार्थांचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ते लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढवतात . सोप्या भाषेत सांगायचं तर, अति- प्रक्रिया केलेले अन्न आपल्या आरोग्यासाठी एक मोठा धोका निर्माण करतात. ४३ जागतिक तज्ञांच्या मते आणि द लॅन्सेटच्या या नवीन मालिकेनुसार, अति- प्रक्रिया केलेले अन्न आपल्याला गंभीर आजारांना बळी पडत आहेत.
अल्ट्रा -प्रोसेस्ड अन्न म्हणजे काय आणि अल्ट्रा – प्रोसेस्ड अन्नाचे दुष्परिणाम
लॅन्सेटच्या एका नवीन अहवालानुसार, अल्ट्रा- प्रोसेस्ड फूड्स ( UPFS ) हे फॅट , साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असलेले एक सूत्र आहे. त्यात स्टेबिलायझर्स , इमल्सीफायर्स , कलरंट्स आणि फ्लेवरिंग्जसारखे हानिकारक घटक असतात , तसंच कॉस्मेटिक अॅडिटीव्ह असतात. ते नफा , वापर आणि सोयीसाठी डिझाइन केलेले असतात. या पदार्थांशी संबंधित जाहिरातींचा वापर मुलांना आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा बाजारातील वाटा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
टिक्की, फ्रेंच फ्राईज, मांस, चिकन आणि इतर अनेक अन्न पर्यायांसारखे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स अल्ट्रा – प्रोसेस्ड फूड्समध्ये रूपांतरित केले जातात आणि लोकांच्या घरी पोहोचवले जातात. रसायनांचा समावेश केल्याने हे पदार्थ अनेक महिने खाण्यायोग्य राहतात. तथापि, असंख्य अहवालांमधून असे दिसून आले आहे की, यामुळे केवळ लठ्ठपणा वाढत नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो .
या अहवालात असंही म्हटलं आहे की, आज किरकोळ दुकानांमध्येही पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकणारे स्नॅक्स, नूडल्स , बिस्किटे आणि साखरेचे पदार्थ मिळतात. यामध्ये मुलांना खायला आवडणारे अनेक पदार्थही आहेत.२००६ मध्ये भारतात किरकोळ विक्री $०.९ अब्ज होती आणि २०१९ मध्ये ती जवळजवळ $३८ अब्ज झाली, म्हणजे जवळजवळ ४० पट वाढ. दुष्परिणामांबद्दल बोलायचं झाले तर, भारतातील पुरुष आणि महिला दोघांमध्येही लठ्ठपणा दुप्पट झाला आहे.
या खाण्याच्या सवयीमुळे चयापचय विकार होतात. यामध्ये ICMR-INDIAB-17 (2023) मधील डेटा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीमध्ये (28.6%) लठ्ठपणा आढळून आला आहे. प्रत्येक 10 पैकी 1 व्यक्ती (11.4 %) मधुमेहाने ग्रस्त आहे , प्रत्येक 7 पैकी 1 व्यक्ती (15.3 %) प्री-डायबेटिसने ग्रस्त आहे. तर, प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती (39.5 % ) पोटाच्या स्थूलपणाने ग्रस्त आहे. 2016 मध्ये मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 2.1 होते, जे 2019-21 मध्ये वाढून 3.4 झाले आहे.
