Download App

अर्र..ईएमआय भरायचा राहिला? भुर्दंड कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!

एखाद्या वेळी जर ईएमआय भरता आला नाही (Loan Payment Delayed) तर मोठी अडचण होते. बँकेकडून दंड आकारला जातो.

Loan Payment Delayed : आजच्या महागाईच्या दिवसांत तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी वस्तू घ्यायची असेल तर कर्जच घ्यावे लागते. कर्जाच्या पैशांतून तुम्ही तुम्हाला पाहिजे ती वस्तू खरेदी करू शकता. पण तुम्हाला व्याज द्यावे लागते. कर्जाचे पैसे दर महिन्याला ईएमआयच्या माध्यमातून (Loan EMI) भरावे लागतात. त्यामुळे दर महिन्याच्या ठराविक तारखेला बँक खात्यात पैसे ठेवावेच लागतात. पण एखाद्या वेळी जर ईएमआय भरता आला नाही (Loan Payment Delayed) तर मोठी अडचण होते. बँकेकडून दंड आकारला जातो. तसेच कर्जदाराचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) सुद्धा खराब होतो.

अशा वेळी काही तातडीची पावले उचलण्याची गरज असते. सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुमच्याकडून एखाद्या महिन्यात ईएमआय भरला गेला नाही तर तुम्हाला दंड म्हणून जास्तीचे पैसे भरावे लागतात. वेगवेगळ्या बँकांचे चार्जेस (Bank Charges) वेगवेगळे असतात.

Credit Card की पर्सनल लोन? जास्त फायदा कशात.. जाणून घ्या A टू Z माहिती

जर ईएमआयच्या तारखेत काही दिवसांचा उशीर झाला असेल तर ईएमआय लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करा. कारण काही बँका किंवा वित्तीय संस्था ईएमआय डेट उलटून गेल्यानंतरही तीन ते चार दिवसांची सवलत देतात. जर या तीन ते चार दिवसांत तुम्ही पैसे भरले तर तुम्ही अतिरिक्त दंडापासून वाचू शकता.

जर तुमचा एखादा ईएमआय चुकला तर आधी तुमच्या बँक किंवा वित्तीय संस्थेची संपर्क साधा. ईएमआय भरण्यात उशीर का झाला याचे कारण त्यांना सांगा. तुमची अडचण ऐकून घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला दंड आकारला जाणारही नाही.

ईएमआय वेळेवर भरला गेला नाही तर सर्वाधिक परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर (Credit Report) होतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज घेण्यात अडचणी येतात. जर ईएमआय भरण्यात एक महिन्या पेक्षा जास्त उशीर झाला तर याची नोंद क्रेडिट रिपोर्ट मध्ये घेतली जाते. त्यामुळे क्रेडिट रिपोर्ट चांगला ठेवायचा असेल तर ईएमआय मध्ये उशीर होणार नाही याची काळजी घ्या.

काय आहेत उपाय

जर एखाद्या वेळी तुम्ही कर्जाचा हप्ता भरण्यास विसरला असाल किंवा कामाच्या गडबडीत तुमच्याकडून हप्त्याची तारीख लक्षात राहिली तर याचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागते. अशा वेळी युपीआय अॅपमध्ये तुम्ही ऑटोपे पर्याय सेट करून ठेऊ शकता. यामुळे ठरलेल्या तारखेला तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होत राहतील. तुम्हाला तारीख लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही.

तुम्ही तुमचा पगार 50:30:20 प्रमाणात विभागून सेव्हिंग करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा उपयोग करून सेव्हिंग आणि खर्च दोन्हींचे संतुलन साधू शकाल.

सिगारेट पिताय? मग सावध व्हा, ‘या’ 5 आजारांचा धोका; अकाली वृद्धत्वाचीही शक्यता

follow us