Credit Card की पर्सनल लोन? जास्त फायदा कशात.. जाणून घ्या A टू Z माहिती

Credit Card की पर्सनल लोन? जास्त फायदा कशात.. जाणून घ्या A टू Z माहिती

Credit Card vs Loan : क्रेडिट कार्डच्या आविष्कारानंतर पेमेंट (Credit Card) करणे खूप सोपे झाले आहे. इमर्जन्सीमध्ये क्रेडिट कार्ड खूप उपयोगी ठरते. अशा वेळी तुम्ही मोठे पेमेंट काही सेकंदात करू शकता. नंतर अगदी निवांतपणे तुम्ही या पैशांचा भरणा करू शकता. तसेच पर्सनल लोन घेऊनही (Personal Loan) या पैशांचा वापर अनेक पद्धतींनी केला जाऊ शकतो. परंतु पर्सनल लोन मिळण्यात वेळ लागू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इमर्जन्सी प्रसंगात इन्स्टंट लोनचा वापर (Instant Loan) करता येत नाही.

याबरोबरच क्रेडिट कार्ड आणि कर्जाचे काही फायदे आणि नुकसानही आहे. चला तर मग जाणून घेऊ की या दोन्हींमध्ये तुमच्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरेल..

Loan Write Off : बँकांनी 5 वर्षांत 10 लाख कोटींच्या कर्जावर सोडलं पाणी; उद्योजकांचा वाटा सर्वाधिक

कशात जास्त फायदा

क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन दोन्हीही unsecured कॅटेगरी मध्ये मोडतात. जर तुम्ही क्रेडिट स्कोअर बॅलन्स (Credit Score) करू इच्छित असाल तर तुम्हाला सिक्योर आणि अनसिक्योर दोन्ही कर्ज घ्यावे लागतील. तेव्हाच तुम्ही क्रेडिट स्कोअरमध्ये संतुलन साधू शकाल. क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन या दोघांत काय फायदेशीर आहे हे तुमच्या गरजांवर अवलंबून असते.

जर तुम्हाला एकरकमी पैसे पाहिजे असतील तर पर्सनल लोन चांगला पर्याय आहे. पण जर लहान मोठ्या खर्चासाठी पैसे पाहिजे असतील तसेच क्रेडिट कार्डमधील रिवार्ड पॉईंट्स पाहिजे असतील तर क्रेडिट कार्ड घेणे योग्य ठरेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तितकेच पैसे खर्च करा जितके तुम्ही महिन्याच्या शेवटी भरू शकाल.

या बरोबरच क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला वर्षांच्या हिशोबाने चार्जेस द्यावे लागतात. हे चार्जेस क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या सुविधांच्या हिशोबाने आकारले जातात. प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था वेगवेगळे चार्जेस आकारतात. पर्सनल लोनमध्ये सुद्धा कर्जदाराला दर महिन्याला हप्ता भरावा लागतो. या ईएमआयमध्ये व्याज (Loan EMI) आणि वस्तूची किंमत दोन्हीही समाविष्ट असतात. अशा परिस्थितीत लोनवरील व्याज आणि क्रेडिट कार्डवरील चार्जेस यांची तुलना करून तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला ठरेल याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.

सिबील स्कोअर शून्य असेल तर कर्ज मिळेल का? जाणून घ्या, महत्त्वाची माहिती..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube