IAF Agniveervayu Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायु’ (Agnivir Vayu) पदासाठी भरती जाहीर केली आहे. दरम्यान, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो? लेखी परीक्षा कधी होणार, शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.
Manisha Koirala: वयाच्या 53 व्या वर्षीही हिरामंडीतील ‘ही’ अभिनेत्री अविवाहित, काय आहे कारण?
भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर वायु 02/2025 च्या भरतीसाठी 8 जुलै 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. 28 जुलैपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
IAF अग्नीवीर भरतीसाठी पुरुष आणि महिला असे दोन्हीही उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, महिलांमध्ये केवळ अविवाहित महिलाच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच अग्निवीर वायु भरतीनंतर एखाद्या महिलेला नियमित शिपाई म्हणून हवाई दलात सामील व्हायचे असले तरी या काळात ती गर्भवती राहू शकत नाही.
विरोधी पक्षनेता बोलायला लागताच नेहरू मागे फिरले, अन्….; शरद पवारांनी सांगितला किस्सा…
ही भरती अग्निवीर वायुजल योजनेंतर्गत होत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांसाठी सेवेची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे विषय घेऊन 12 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याने 50% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराने कमीत कमी अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
वयोमर्यादा –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 3 जुलै 2004 ते 3 जानेवारी 2008 या कालावधीत झालेला असावा. (नोंदणीच्या तारखेला उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे).
अर्ज फी –
उमेदवारांना अर्ज शुल्क रु 550/- + GST भरावे लागेल.
अग्नीवीर म्हणून हवाई दलात सामील होण्यासाठी उमेदवार agnipathvayu.cdac.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
लेखी परीक्षा –
अग्निवार हवाई दल भरती 2024 ची लेखी परीक्षा 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
अधिसूचना लिंक: https://agnipathvayu.cdac.in/AV/img/upcoming/AGNIVEER_VAYU_02-2025.pdf
अर्ज कसा करावा?
वायुसेनेच्या अग्निवीर वायु पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात काही चुका झाल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमदेवारांनी नोंद घ्यावी.