IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू केली आहे. या भरती अंतर्गत ‘वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि सेक्रेटरी टू डायरेक्टर’ या पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? अर्ज फी किती? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घ्या.
आघाडीत ठिणगी! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर थोरात, वडेट्टीवार, पाटलांचा आक्षेप
पद आणि पदसंख्या
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [प्रशासन आणि एचआर] या पदासाठी एकूण एका पदावर भरती केली जाईल.
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [वित्त आणि लेखा] या पदासाठी एकूण एका पदाची भरती केली जाईल.
सचिव ते संचालक या पदासाठी एकूण एका पदाची भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
1. वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [प्रशासन आणि मानव संसाधन] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 55 टक्क्यांसह संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे.
2. वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [वित्त आणि लेखा] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) मध्ये ACA/AICWA किंवा मास्टर्समधील शिक्षण असणं आवश्यक आहे. किंवा 55% सह M.Com पूर्ण केलेले असावे.
3. सेक्रेटरी टू डायरेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 55 % सह संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे.
पगार –
1. वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [प्रशासन आणि मानव संसाधन] या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 78,800/- ते 2,09,200/- रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
2. वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [वित्त आणि लेखा] या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 78,800/- ते 2,09,200/- रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
3. सेक्रेटरी टू डायरेक्टर या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 47,500/- ते 1,15,100/- रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
फी –
नोकरीचा अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांना रु. 590/- अर्ज शुल्क भरावे लागेल. मात्र, महिलांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 12 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट लिंक –
https://iimmumbai.ac.in/careers
अधिसूचना –
https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2247/171897506648.pdf
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोकरीची अधिसूचना वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा. नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी नोकरीचा अर्ज भरणे आवश्यक आहे.
उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.