इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी, महिन्याला 67,700 रुपये पगार
IIM Mumbai recruitment 2024: आज अनेकजण चांगल्या नोकरीच्या (job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात मनासारखी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही देखील चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आहे. ती म्हणजे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (Institute of Management) मुंबई अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) या पदासाठी भरती प्रकिया सुरू झाली. या पदासाठी कोणी अर्ज करावा, पात्रता निकष आणि अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.
ज्ञानमंदिर शाळेला मिळाली स्कूलबस; इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी
पद आणि पंदाची संख्या –
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई मध्ये वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एक जागा भरल्या जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता-
वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ इंडिया या सारख्या संस्थांमधून CA/CMA ची व्यावसायिक पात्रता असलेली पदवी असणं आवश्यक आहे.
Mrunmayee Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं भुरळ पाडणारं सौंदर्य
पगार
उमेदवाराची वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला 67,700/- वेतन दिले जाईल.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची अधिकृत वेबसाइट – https://iimmumbai.ac.in/
अधिसूचना –
https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2232/171300685140.pdf
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वर नमूद केलेल्या पदभरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरावी. उमेदवारांनी हा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पाठवला पाहिजे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2024 आहे.
उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. अर्जात काही चुका राहिल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळं उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच आपला अर्ज सादर करावा.