ज्ञानमंदिर शाळेला मिळाली स्कूलबस; इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

ज्ञानमंदिर शाळेला मिळाली स्कूलबस; इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

Pune News : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलित श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते स्कूल बसची चावी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. ज्ञानदानाच्या या कार्यात बालन ग्रुपनेही मोलाची मदत केली.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ राज्यभरच नाही तर देशभरात विविध क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा झेंडा अगदी काश्मीरपर्यंत डौलाने फडकत आहे. यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्यांचा समावेश आहे. पोलीस विभाग आणि लष्करासोबतही त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावले आहे. त्याचाच भाग म्हणून शिखर शिंगणापूर येथेही वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत सुरु असलेल्या श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून 41 आसन क्षमता असलेली स्कूल बस देण्यात आली.

मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हा, कंटेट क्रिएटरर्सना पुनीत बालन यांचे आवाहन

दुष्काळी भाग असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरातील विद्यार्थ्यांना या स्कूल बसचा उपयोग होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स मेंबर राजय शास्तारे, आदित्य जोशी, अमोल येवले आणि महेश सोनी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वांत मोठे साधन आहे. दुष्काळी आणि ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना केवळ प्रवासाच्या सुविधेअभावी या शिक्षणापासून वंचित रहावं लागू नये, या भावनेतून श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ही स्कूल बस देण्यात आली. या शैक्षणिक कार्यास हातभार लावता आला, याचं मनापासून समाधान आहे, असे पुनीत बालन म्हणाले.

Pune Lok Sabha: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उद्योजक पुनीत बालन यांची ‘युवा’ ताकद !

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज