नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रतिदिन 5 ग्रॅम मीठाचे (Salt) सेवन करण्याची शिफारस केली आहे. मात्र, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये यापेक्षा जास्त मीठाचं आहारातून सेवन केल्या जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (ICMR-NIE) मीठाचा वापर कमी करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला.
ठाकरे बंधूंच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार ; वकील गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं
शहरी भागातील एक व्यक्ती सरासरी ९.२ ग्रॅम मीठ वापरते, तर ग्रामीण भागातील एक व्यक्ती दररोज ५.६ ग्रॅम मीठ वापरते. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेनं शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंडाचे आजारांचा धोका वाढतो, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (NIE) च्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यामुळे आता कमी-सोडियम मीठ (Low-Sodium Salt) च्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.
आता आरक्षण घेऊनच मागं येणार अन्यथा…29 ऑगस्टच्या मोर्चाबद्दल काय म्हणाले जरांगे पाटील
याच अभ्यासाचा भाग म्हणून NIE ने पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांसाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहकार्याने केले जात आहे. या प्रकल्पाबाबत एनआयईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कुमार म्हणाले की, हा प्रकल्प उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तदाब आणि सोडियमचे सेवन कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या संरचित मीठाच्या परिणामांचं मूल्यांकन करणं हा आहे. सध्या पहिल्या वर्षात, हा प्रकल्प बेसलाइन मूल्यांकनांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, अतिरिक्त सोडियम सेवनामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. त्यामुळे मीठाचा आहारातील वापर कमी करणं हे राष्ट्रीय प्राधान्य आहे, असे आयसीएमआर-एनआयई येथील अभ्यासाचे प्रमुख अन्वेषक डॉ. शरण मुरली म्हणाले. त्यामुळं आहारात फक्त चिमुटभरच मीठ वापरावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कमी सोडियमचे सेवन केल्यानं रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळं कमी-सोडियम पर्याय एक फायदेशीर पर्याय ठरतो, असंही ते म्हणाले.
कमी-सोडियम मीठाची किंमत जास्त
तर चेन्नईमधील एका बाजार सर्वेक्षणात असे दिसून आले की, कमी-सोडियम मीठ फक्त 28% किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याची किंमत नियमित मिठाच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, ICMR-NIE ने ट्विटर आणि लिंक्डइनवर #PinchForAChange मीठाच्या अल्प वापरासाठी एक मोहीमही सुरू केली आहे.