International Day of Older Persons 2024 : आपल्यापेक्षा मोठे आणि वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करणं आपलं (International Day of Older Persons 2024) कर्तव्यच आहे. आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदर असलाच पाहिजे. आपल्या मनातील त्यांच्या बद्दलचा हा आदर व्यक्त करण्यासाठी जागतिक पातळीवर एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. दरवर्षी १ ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात येतो. जगभरात वयोवृद्ध लोकांवर (Senior Citizens) होणार अन्याय, त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष या गोष्टींवर आळा घालण्याच्या उद्देशाने या दिवसाचे खास महत्त्व आहे.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करा असे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. मोठ्या लोकांचा आशीर्वाद, त्यांचा अनुभव आपल्याला नेहमीच उपयोगाचा ठरतो. घरातलं चालत बोलतं विद्यापीठ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा अनुभव हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी ठरू शकते. परंतु आज अनेक ठिकाणी वयोवृद्ध लोकांना अपमानास्पद वागणूक मिळते. स्वतः ची मुले देखील त्यांचा सांभाळ करत नाही. त्यांना घराबाहेर काढण्याचेही प्रसंग दिसतात. अशा परिस्थितीत वृध्द लोकांना जीवन व्यतित करणं अतिशय कठीण होऊन बसतं.
वयोवृध्द लोकांकडे सन्मानाच्या आणि आदराच्या दृष्टीने पाहिलं जावं, त्यांच्यावरील अन्यायाची वागणूक नाहीशी व्हावी या उद्देशाने हा दिवस सुरू करण्यात आला. आज आपण जाणून घेऊ या की आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस का सुरू करण्यात आला, कधीपासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला याची माहिती घेऊ या..
दरवर्षी १ ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र महासभेने १४ ऑक्टोबर १९९० या दिवशी वयोवृद्ध लोकांसाठी आंतरराष्ट्रीय वृद्धजन दिवस सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर १ ऑक्टोबर हा दिवस निश्चित करण्यात आला. या दिवशी वयोवृद्ध लोकांचा सन्मान आणि त्यांची सेवा करण्याचा संकल्प करायला हवा. त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी उचलायला हवी.
आज जगभरात वृद्ध लोकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. घरगुती हिंसेचा फटका महिला आणि वयोवृद्ध लोकांना जास्त बसत आहे. मुले आपल्या माता पित्यांचा सांभाळ करत नाहीत. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहणे भाग पडत आहे अशा अनेक घटना रोजच आपल्या कानी पडतात. या गोष्टींना आळा घालण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध स्वयंसेवी संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृद्धांवर होणारे अन्याय समाजासमोर आणण्याचे काम करतात. तसेच वृद्धांप्रती सन्मानाचा भाव ठेवा असा संदेश देतात. यासाठी मोहिमा चालवल्या जातात.
5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..