Download App

इंडियन ऑईलमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती सुरू, महिन्याला मिळणार 1 लाखांहून अधिक पगार…

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीअंतर्गत, ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट टेक्निकल ही पदे भरली जाणार.

  • Written By: Last Updated:

IOCL Bharti 2024 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Limited) नॉन-एक्झिक्युटिव्ह अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (Junior Engineering Assistant), ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट अशा विविध पदांच्या 467 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कऱण्याची शेवटती तारीख काय? शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.

Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक अन् कलावंतांना मानधन योजना 

एकूण पदे – 467

शैक्षणिक पात्रता-
10 उत्तीर्ण असण्याबरोबर मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा, इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा यासारख्या संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा डिप्लोमा / संबंधित क्षेत्रातील पदवी/ ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे

वयोमर्यादा –
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या; दिल्ली कोर्टाकडून समन्स जारी, नक्की काय आहे प्रकरण? 

अर्ज शुल्क:

सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील अर्जदारांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWBD/XSM उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जाची फी ऑनलाइन भरावी लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 जुलैपासून सुरू झाली आहे. 21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्जाची पद्धत –
या पदांसाठी अर्ज कऱण्यासाठी उमेदवार iocl.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया-
1) लेखी परीक्षा
2) कागदपत्रांची पडताळणी
3) क्लिनिकल चाचण्या
पगार-
उमेदवारांना 25 हजार ते 1 लाख 5 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

परीक्षा कधी होणार?

या भरती प्रक्रियेतील संगणक आधारीत परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये घेतली जाईल. परीक्षेचे ई-प्रवेशपत्र 10 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले जाईल.

ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?
1) सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जा.
2) होमपेजवरील लेटेस्ट जॉब ओपनिंगवर जा आणि Clicl here to applu वर क्लिक करा.
3) एक नवीन पृष्ठ उघडेल, तिथे To Register हा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
4) आता already registered? To Login वर क्लिक करा, सर्व माहिती अचूक भरा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
5) शेवटी सर्व फॉर्म भरल्यानंतर फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

अधिकृत वेबसाइट लिंक-https://iocl.com/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक –
https://cdn.dicialm.com/EForms/configuredHtml/1258/89908/Index.html

अधिकृत जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1MfU8WD6KL_yc1xfNh1d1BD4PTjGhMyrN/view

follow us