Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक अन् कलावंतांना मानधन योजना

Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक अन् कलावंतांना मानधन योजना

Government Schemes : साहित्य व कला (Literature and Art)या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना(Artist) वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी, २०१४ ला मानधन योजना सुरु करण्यात आली. विधवा तसेच परितक्त्या वृध्द महिला कलाकारांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येते. योजनेंतर्गत दिली जाणारी मानधन राशी लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते. योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे. वुद्ध कलाकारांसाठी सुरु करण्यात आलेली जीवनदायी अशी ही एक योजना आहे. योजनेंतर्गत जातीचा प्रवर्ग निश्चित केलेला नाही, त्यामुळे सदर योजना राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकारांना लागू आहे.

Yash: ‘रॉकी भाई’ डॅशिंग लूक ठरतोय वेगळा, ‘टॉक्सिक’ चित्रपटातील लेटेस्ट स्टाईल होतेय व्हायरल

योजनेच्या प्रमुख अटी : साहित्य कला किंवा वाड्.मय क्षेत्रात 15 ते 20 वर्षे या कालावधीत महत्वपूर्ण कामगिरी

नेपाळमध्ये सौर्या एअरलाईन्सच्या विमान कसं क्रॅश झालं; व्हिडिओ आला समोर

वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेत समाविष्ट कलाकार :
भजनी
किर्तनी
गोंधळी
आराधी
तमाशा
साहित्यिक
गायक
वादक
कवी
लेखक
महिला
विधवा
दिव्यांग कलाकार

आवश्यक कागदपत्रे :
अर्ज
आधार कार्ड
रेशन कार्ड
कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे इतके काम केल्याचे पुरावे
रहिवाशी दाखला
दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
उत्पन्न दाखला
वयाचा दाखला
अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
बँक खात्याचा तपशील

लाभाचे स्वरूप :
अ वर्ग- रु.2,100/- प्रति महिना
ब वर्ग – रु.1,800/- प्रति महिना
क वर्ग- रु.1,200/- प्रति महिना

संपर्क साधण्याचे ठिकाण : गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube