Download App

कॅमेरा मॉड्यूल अन् बॉडी ; iPhone 17 Pro मध्ये ‘हे’ 4 मोठे बदल होण्याची शक्यता…

iPhone 17 pro expected features titanium body camera : आयफोन 16 सीरीज लाँच झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आयफोन 17 (iPhone 17 pro) सीरीजवर लागल्या आहेत. Apple iPhone 17 Pro काही बदलांसह सादर केला जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. iPhone 16 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर आता सर्वजण आयफोन (iPhone) 17 ची वाट पाहत आहे. Apple 2025 मध्ये नवीन iPhone सीरीज लाँच करणार आहे. त्यासाठी अद्याप वेळ आहे, परंतु नवीन आयफोनशी संबंधित चर्चा सुरूच आहेत. दरम्यान असं वृत्त समोर आलंय की, Apple आगामी iPhone 17 Pro मध्ये चार बदल करू शकते. असं झाल्यास वापरकर्ता म्हणून केवळ तुमचा अनुभवच बदलणार नाही तर आयफोन प्रो मॉडेलला देखील एक नवीन ओळख मिळू शकते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातोय की, iPhone 17 Pro च्या कॅमेरा फीचरमध्ये काही बदल केले जातील. याशिवाय कामगिरीच्या बाबतीतही बदल अपेक्षित आहेत. आयफोन 17 प्रो मध्ये कोणते चार मोठे बदल केले जाऊ शकतात ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

बांग्लादेशच्या सीमेवर मोठा गोंधळ; भारतीय संतांची निदर्शने, चिन्मय प्रभूच्या सुटकेची मागणी

आयफोन 17 प्रो बॉडी
आयफोन 16 सीरीजच्या प्रो मॉडेल्समध्ये टायटॅनियम बॉडी वापरली जात आहे. रिपोर्ट्सनुसार आयफोन 17 प्रो टायटॅनियमऐवजी ॲल्युमिनियम बॉडीसह लॉन्च केला जाऊ शकतो. जर हा बदल झाला, तर नवीन आयफोन प्रो मॉडेलच्या शरीराच्या गुणवत्तेतील हा एक मोठा दोष मानला जाऊ शकतो. कारण टायटॅनियमच्या तुलनेत ॲल्युमिनियमची बॉडी कमी टिकाऊ आहे.

जबरदस्त! The Railway Men ने जिंकले सहा Filmfare OTT Awards

iPhone 17 Pro चे कॅमेरा मॉड्यूल
iPhone 11 Pro पासून सुरुवात करून, Apple सतत प्रो मॉडेल्सना खास प्रकारचे कॅमेरा मॉड्यूल डिझाइन देत आहे. यामध्ये त्रिकोणी डिझाईन मॉड्यूलमध्ये तीन कॅमेरे बसतात. पण असा दावा केला जातोय की, iPhone 17 Pro मध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल डिझाइन दिले जाऊ शकते.

iPhone 17 Pro ची कॅमेरा वैशिष्ट्ये
iPhone 16 Pro चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सुधारला गेला आहे. फ्रंट कॅमेरा 12MP ऐवजी 48MP वर उपलब्ध आहे. आता iPhone 17 Pro बद्दल बोलायचे झाले, तर त्यात टेलीफोटो कॅमेरा सुधारला जाऊ शकतो. नवीन मॉडेलमध्ये 12MP 5x टेलिफोटो कॅमेऱ्याऐवजी 48MP 5x टेलिफोटो वापरता येईल.

iPhone 17 Pro ची कामगिरी
iPhone 17 Pro च्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. Apple या iPhone मध्ये A19 Pro चिपसेटची शक्ती वापरू शकते . A19 Pro चिपसेट A18 Pro चिपसेटपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. त्यामुळे iPhone 17 Pro परफॉर्मन्सच्या बाबतीत चांगला असू शकतो.

 

follow us

संबंधित बातम्या