Personal Loan Top Up : आजच्या महागाईच्या दिवसांत कोणतीही मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर कर्ज घ्यावेच लागते. पर्सनल लोन घेतल्याने (Presonal Loan) व्यक्तीवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होतो. परंतु या कर्जावर कर्जदाराला व्याज मात्र द्यावेच लागते. कधी कधी तुम्ही जितके कर्ज घेतले त्यापेक्षा जास्त पैशांची गरज असते. या परिस्थितीत लोन टॉप अप हा (Top Up) एक पर्याय असतो. परंतु टॉप अप करून आणखी कर्ज घेणे कितपत योग्य ठरू शकते. हा प्रश्न आहेच.
टॉप अप योजनेत कर्जदार त्याला मिळालेल्या कर्ज रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेसाठी अर्ज करू शकतो. ज्यावेळी कर्जदाराला जास्त पैशांची गरज असते तेव्हा टॉप अपसाठी अर्ज करता येईल. पर्सनल लोनवर टॉप अप करण्यासाठी कर्जदाराला कोणत्याच कागदपत्रांची आवश्यकता नसते. कारण सर्व कागदपत्रे बँकेकडे आधीच असतात. तसेच पर्सनल लोनच्या व्याजदरानुसारच टॉप अप रक्कम मिळते.
अर्र..ईएमआय भरायचा राहिला? भुर्दंड कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!
लोन टॉप अपचे काही नुकसान सुद्धा आहे. यामुळे कर्जदारावरील कर्जाची रक्कम वाढते. यामुळे ईएमआय देखील (Loan EMI) वाढतो तसेच ईएमआय कालावधीत वाढ होते.
टॉप अप लोन फायदेशीर ठरण्यासाठी सध्या किती व्याजदर आहे यावर अवलंबून असते. जर व्याज आधीच्या (Loan Interest) कर्जापेक्षा जास्त असेल तर दुसरे कर्ज घेणे नुकसानीचे ठरू शकते. ईएमआयचा अवधी आणि रक्कम किती वाढणार याचा विचार करावा लागतो. वाढलेल्या ईएमआयचा भार कर्जदार सहन करू शकणार आहे का हे देखील पहावे लागेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पाहून तुम्ही परत करू शकाल इतकेच कर्ज घेणे योग्य ठरेल.
पगारातील एक हिस्सा इमर्जन्सीसाठी नेहमी बाजूला काढून ठेवला पाहिजे. पगार खात्यात जमा होताच आधी सेव्हिंगचे पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत. तुम्ही घेतलेले कर्ज तुमच्या इमर्जन्सी फंडवर भारी पडणार नाही याची काळजी घेतली गेलीच पाहिजे. एकदा अर्थचक्र बिघडले तर पुन्हा पहिली स्थिती आणणे खूप कठीण ठरते. त्यानमुळे सर्व विचार करूनच टॉप अप लोनबाबत निर्णय घ्या.
अनेकांना दिलासा, SBI चे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त; जाणून घ्या नवीन दर