Download App

काय, तुमचा फोन तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतोय? सावध व्हा, ‘या’ टिप्सने रोखा फोनची हेरगिरी

आपला फोन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत तर नाही ना.. काय हे खरं आहे का? अन् जर हे खरं असेल तर यातून वाचण्याचा मार्ग नक्की काय आहे?

Smartphone Tips : जरा विचार करा तुम्ही तुमच्या मित्राशी फोनवर बोलत असाल आणि बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मित्रा आता मला एक दुचाकी घ्यायची आहे. तुमच्या मित्राला आनंद वाटेल. दुचाकी कधी घेतो असं तो तुम्हाला विचारीलही. पण हीच गोष्ट ऐकून काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वाहनांच्या जाहिराती दिसू लागल्या तर.. जरा वेगळं वाटतं ना.. कधी कधी असंही वाटतं की आपला फोन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत तर नाही ना.. काय हे खरं आहे का? अन् जर हे खरं असेल तर यातून वाचण्याचा मार्ग नक्की काय आहे?

स्मार्टफोन खरंच तुमचं संभाषण ऐकतो का, याचं उत्तर आधी मिळवू.

तुमच्या फोनमध्ये Siri, Google Assistant, Alexa सारखे व्हॉईस असिस्टंट असतात. हे असिस्टंट प्रत्येक वेळी ‘Hey Siri’ किंवा ‘OK Google’ अशा कमांड ऐकण्यासाठी सज्ज असतात. म्हणजेच तुमचा फोन प्रत्येक वेळी काहीनाकाही ऐकायला तयार असतो जे ऐकून त्याची उत्तरे तुम्हाला देऊ शकेल. पण ज्यावेळी ऐकण्याची ही सवय फक्त कमांड ऐकण्यापर्यंत मर्यादित राहत नाही तिथून पुढे अडचणी निर्माण होतात.

कंपन्यांचा फायदा काय

जितकी जास्त माहिती तितक्या जास्त पर्सनल ॲड हे आता समीकरणच बनले आहे. जर कंपन्यांना कळले की तुम्ही नुकतीच ट्रॅक सूट किंवा अन्य एखाद्या वस्तूची चर्चा करत होतात मग लगेच त्या वस्तूंच्या जाहिराती दिसायला सुरू होतात. आता हे नेमकं कसं घडलं असा प्रश्न पडला तर लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी घडतात त्या तुमच्या पर्सनल डेटामधून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागणुकीतून आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दिलेल्या अॅप परमिशनमधून.

Phone Blast Issue : सावधान! तुमच्यापण फोनचा स्फोट होऊ शकतो…

फोन काही ऐकतोय कसं कळेल, जाणून घ्या Step by Step

तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकत आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर यासाठी काही खास ट्रिक्स आहेत. यासाठी तुम्हाला तीन स्टेप फॉलो कराव्या लागतील. सर्वात पहिली पायरी म्हणजे असा एखादा टॉपिक निवडा ज्याच्याशी तुमचा काहीच संबंध नसेल. काही दिवसांपर्यंत तुमच्या फोनजवळ फक्त याच गोष्टीची चर्चा करा. पण याच दरम्यान या विषयाशी संबंधित कोणतीही माहिती इंटरनेटवर सर्च करू नका. यानंतर पहा की या टॉपिकशी संबंधित जाहिराती सुरू झाल्या आहेत का? जर जाहिराती सुरू झालेल्या असतील तर यात नक्कीच काहीतरी गडबड आहे हे ओळखून घ्या.

फोनची हेरगिरी कशी रोखाल

स्मार्टफोनकडून होणारी ही पाळत बंद करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला फोनमधील व्हॉईस असिस्टंटला बंद म्हणावं लागेल. ही गोष्ट कशी होईल तर यासाठी काही टिप्स आहेत.

तुमच्याकडे जर iPhone असेल तर सर्वात आधी फोनमधील सेटिंग्स मध्ये जा. येथे फक्त Siri & Search या पर्यायावर क्लिक करा. तेथे जाऊन Hey Siri आणि Press Side Button for Siri दोन्ही बंद करून टाका.

अँड्रॉइड फोनमध्ये सर्वात आधी Google अॅप खोला. नंतर सेटिंग्ज मध्ये जा. त्यानंतर Google Assistant मध्ये General Option वर क्लिक करा. नंतर Google Assistant पर्यायाला बंद करून टाका.

माईक ॲक्सेस कोणाला दिला कसं कळेल

जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर सर्वात आधी फोनमधील सेटिंग्समध्ये जा. नंतर Privacy Permission Manager, microphone मध्ये जा आणि येथून अनावश्यक अॅप्सना माईक ॲक्सेस देणे बंद करा. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर सेटिंग्जमध्ये जाऊन येथे प्रायव्हसी आणि मायक्रोफोनवर क्लिक करून प्रत्येक अॅप माहिती करून घ्या. ज्याची गरज वाटत नाही त्याचे स्विच बंद करून टाका.

तुमचा स्मार्टफोन किती फास्ट अन् पॉवरफुल? मिनिटांत मिळेल उत्तर; जाणून घ्या Step-by-Step

जर तुम्हाला आणखी जास्त प्रायव्हसी पाहिजे असेल तर फोनच्या कॅमेऱ्यावर स्टिकर किंवा कव्हर लावून टाका. तसेच माइक सुद्धा कधीकधी टेपने कव्हर करू शकता. पण असे केल्याने तुम्हाला कॉल करण्यात अडचणी येऊ शकतात.

सुरक्षेसाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

नेहमी विश्वासार्ह ॲप्सनाच परवानगी द्या.

अॅप डाउनलोड करताना अॅप तुमच्याकडून कोणकोणत्या परमिशन मागत आहे याकडे लक्ष द्या.

फोन आणि त्यातील ॲप वेळोवेळी अपडेट करत राहा.

आवश्यक वाटेल त्याच अॅप्सना परवानगी देत जा

follow us