Download App

आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केला अनुभव

आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? असा सवाल अनेकांना पडतो, त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी याबाबत एका माध्यम संस्थेशी बोलताना आपला अनुभव शेअर केला आहे.

हल्लीच्या युगात इंटरनेट, युट्युब, सोशल मीडियासारख्या प्लॅटफार्ममुळे लहान मुलांवर अगणित परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच सोशल मीडियावर दिसून येणारा अडल्ट कंटेट असो वा आयटम सॉंग असो, अशा गोष्टींमुळे लहान मुलांना लहान वयातच या गोष्टींबद्दल माहिती मिळत असते. अशा गाण्यांमुळे लहान मुलेही थिरकत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. अशातच आता आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? असा सवाल अनेकांना पडतो, त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी याबाबत एका माध्यम संस्थेशी बोलताना आपला अनुभव शेअर केला आहे.

…तरच विरोधकांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार; फडणवीसांनी गांधींच्या सुचनेचा दाखलाच दिला

एका सातवर्षीय मुलीबद्दल सांगताना मानसशास्त्रज्ञ रिद्धी दोशी म्हणतात, सात वर्षीय मुलगी डान्स रिअॅलिटी शोच्या ऑडिशनसाठी गेली होती. त्यावेळी या मुलीच्या मनात मोठ्या मुलींच्या शरीराची प्रतिमा तयार होत होती. तिने तिच्या छातीवर कागदाचे गोळे लावत नसलेले स्तन दर्शवले असल्याचं पटेल यांनी सांगितलंय. पालकांना आज मुलांनी त्यांच्या वयानूसार करत असलेल्या नृत्यापासून कोणतीही हानी दिसत नाही. घरातही आपण गाणे लावली जातात तेव्हा या मुलांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करीत नसून याकडे पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं. अशावेळी मुलांच्या आकलनावर खोलवर परिणाम होऊ शकतो, असं पटेल यांनी स्पष्ट केलंय.

काही आयटम सॉंगमध्ये आणि अडल्ट म्युझिकमध्ये हिंसा, ड्रग्ज, सेक्स यांसारखे विषय असतील तर मुलांनी समज नसेल तरीही ते गाण्याचं अनुकरण करु शकतात. लहान मुले जसजसे विकसित होतील, तसतसे गाण्याच्या शब्दलेखनाबद्दल विचारु लागतील, अशावेळी पालकांनी योग्य उत्तर दिलं नाही तर मुलं मित्रांना किंवा इतरांनाही विचारुन माहिती मिळवू शकतात. लहान वयात अशी माहिती मिळवणं आणि उत्तेजना या दोन्ही अयोग्य गोष्टी आहेत, कारण लहान मुलांच्या विकासाच्या टप्प्याशी विरोधाभास होऊ शकणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलंय.

पूजा खेडकरचा राज्याच्या मुख्य सचिव अन् मागासवर्ग आयोगाला मेल; मेलमध्ये केली ‘ही’ मागणी

लहान मुलांच्या विचारांवर प्रभाव
लहान मुलांनी आयटम सॉंग अथवा अडल्ट म्युझिक ऐकलं किंवा पाहिल्यास त्यांच्या विचारधारेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशा गाण्याच्या प्रदर्शनामुळे त्यांची समज ही अस्पष्ट होऊ शकते. अयोग्य गोष्टींबद्दल मुलांची संवेदनशीलता कमी होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या युगात सर्व काही ऑनलाईन उपलब्ध असून पालंकाच्या नियंत्रणाशिवाय लहान मुलं इंटरनेटवरुन माहिती घेऊ शकतात. यामध्ये सोशल मीडियासह इतर प्लॅटफार्मची निश्चित भूमिका असते, कारण सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे जिथे पालकांचं नियंत्रण असोस वा नसो कंटेट शेअर करु शकतात, असं मानसशास्त्रज्ञ सुमलता वासुदेव यांनी सांगितलंय.

भावनिक आरोग्यावर हानी?
लहान मुले नृत्य करताना अश्लील हावभाव करताना आणि दाखवताना पाहून सुरुवातीला ते प्रौढांना (पालकांना) गोंडस वाटते पण यात गोंडस असे काहीही नाही. हे लहान वयातच मुलाच्या भावनिक आरोग्याला हानी पोहोचवते, हे मुलाच्या लक्षात येत नाही. पण मुलांना त्यांची स्वप्ने जगण्याचा प्रयत्न करायला हवा.

लहान मुलांवर नेमके काय परिणाम होतात?
गाण्यांच्या प्रदर्शनामुळे त्यांची नैतिकतेची सीमारेषा समजत नाही.
मुलांची संवेदनशीलता कमी होऊ शकते.
भावनिकदृष्ट्या अयोग्य वर्तनांना प्रोत्साहन देऊ शकतात.
नैतिक विकासावर परिणाम होऊ शकतो.
वास्तव आणि काल्पनिक यातील फरक करण्याच्या त्यांच्या क्षमतेला आव्हान मिळू शकतं.

काय करायला हवं?
मुलांना अयोग्य संगीतापासून दूर ठेवणे
सोशल मीडियाबद्दल व्यवस्थापन करण्यासाठी पालकांचे नियंत्रण ठेवणे
काही पालक कॅज्यूअलपणे ही गोष्ट घेतात त्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.
अशा सामग्रीबद्दल जागरूकता नसल्यामुळे दीर्घकालीन मानसिक परिणामांना कमी लेखले जाते तसे करु नये जागरुक व्हायला हवे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते अशा गाण्यांच्या प्रदर्शनामुळे निष्पापपणा कमी होण्यास गती मिळू शकते. लहान मुलांची वागणूक आणि वृत्ती अंगीकारण्यास प्रवृत्त करतात. म्हणजेच वयापेक्षा मोठी होतात.

follow us