Download App

बाजारात Jio Bharat J1 ची एंट्री, मिळणार UPI आणि लाइव्ह टीव्हीसह खूपकाही, किंमत फक्त …

Jio Bharat J1 Launch : भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स देणारा एक नवीन 4G फोन Reliance Jio कडून लाँच करण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Jio Bharat J1 Launch : भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स देणारा एक नवीन 4G फोन Reliance Jio कडून लाँच करण्यात आला आहे. Jio Bharat J1 4G या नावाने Reliance Jio ने हा फोन बाजारात आणला आहे. कंपनीकडून गेल्या वर्षी या फोनची घोषणा करण्यात आली होती.

कंपनीकडून लाँच करण्यात आलेला हा फोन एक 4G कीपॅड फोन असून यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने भन्नाट फीचर्स दिले आहे. या फोनमध्ये Jio ॲप्स आणि सर्व्हिस देखील कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच UPI व्यवहारांसाठी JioPay आणि कंटेंट स्ट्रीमिंगसाठी Jio Cinema चा समावेश करण्यात आला आहे.

Jio Bharat J1 किंमत

Jio Bharat J1 ची भारतीय बाजारात किंमत 1,799 रुपये आहे. ग्राहकांना हा फोन ब्लॅक आणि ग्रे रंगात खरेदी करता येणार आहे. तुम्हाला हा फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध करू देण्यात आला आहे.

Jio Bharat J1 4G स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले- कंपनीने या फोनमध्ये एक नवीन डिजाईन दिला आहे. ग्राहकांना या फोनमध्ये मोठी स्क्रीनसह 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

बॅटरी- तर 2,500mAh ची मोठी बॅटरी देखील कंपनीकडून या फोनमध्ये देण्यात आली आहे.

कॅमेरा- तसेच या फोनमध्ये फ्लॅशलाइटशिवाय डिजिटल कॅमेरा कंपनीने दिला आहे.

प्री-इंस्टॉल- कंपनीकडून या फोनमध्ये Jio Cinema प्री-इंस्टॉल केले आहे. तसेच यूजर्स Jio TV ॲप देखील या फोनमध्ये सहज वापरू शकतात.

पेमेंट – UPI व्यवहारांसाठी कंपनीने या फोनमध्ये JioPay चा ऑप्शन दिला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज UPI पेमेंट करू शकता.

इतर फीचर्स- याच बरोबर या फोनमध्ये तुम्हाला LED टॉर्च आणि वायर्ड हेडफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5mm जॅक देखील मिळणार आहे.

काही झालं तरी हजर राहणार नाही, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगेंची भूमिका…

रिचार्ज प्लॅन- Jio यूजर्स या फोनमध्ये Jio Bharat प्लॅनसह रिचार्ज करू शकतात ज्याची किंमत 123 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्स, दरमहा 14GB 4G डेटा आणि Jio ॲप्स आणि सर्व्हिसचा लाभ घेता येणार आहे.

follow us

संबंधित बातम्या