काही झालं तरी हजर राहणार नाही, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगेंची भूमिका…
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलैपासून अंतरवाली सराटीत सुरु असणारा बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात पुण्यात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात काही झालं तरी हजर राहणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
प्रकरण काय
कोथरूडमध्ये एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांवर आधारित एका नाटक कंपनीचा शिवाजी महाराजांवर आधारित नाटक बघून मनोज जरांगे पाटील यांनी या नाटक कंपनीला आपल्या गावात नाटक सादरीकरणासाठी आमंत्रित केलं होतं परंतु या नाटक निर्मात्यांना हे नाटक सादरीकरणानंतर त्यांचे पैसे दिले गेले नाही म्हणून या प्रकरणाबद्दल नाट्यनिर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी करताना पुणे न्यायालयाने (Pune Court) जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. यापूर्वी या प्रकरणात जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र सुनावणीला हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आला असल्याची माहिती ऍड. हर्षल निंबाळकर यांनी दिली.
मविआकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी, ठाकरे, पटोले की नवीन चेहऱ्याची होणार एंट्री?
तर दुसरीकडे आज गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणारा उपोषण जरांगे पाटील यांनी स्थगित केले. मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या महिलांच्या हातून फळांचा रस पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. तसेच दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती देखील यावेळी जरांगे यांनी दिली.