मविआकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी, ठाकरे, पटोले की नवीन चेहऱ्याची होणार एंट्री?

मविआकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी, ठाकरे, पटोले की नवीन चेहऱ्याची होणार एंट्री?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मिळालेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाविकास आघाडीचा (MVA) मुख्यमंत्री चेहरा कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात यावा असं म्हटले होते. अर्थात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा अशी त्यांची भूमिका होती. 2019 मध्ये माविआने उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती आणि ठाकरे यांनी देखील जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती.

कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल संपूर्ण देशात चर्चा होत होती. याच बरोबर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाला चांगलं यश मिळवून दिल्याने उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिक यंदाच्या विधानसभेला आणखी जोर लावणार हे नक्की.

नाना पटोलेंना ‘रिटर्न गिफ्ट’ ?

तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावाची देखील मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्यासाठी चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला 13 खासदार देणारे नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून (Congress) रिटर्न गिफ्ट मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभेपूर्वी काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेस हायकमांडकडे तक्रार देखील केली होती मात्र तरीही देखील हायकमांडनं त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सध्या जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले यांना विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्पर्धा मिळत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे .

राज्याच्या राजकारणात आज देखील शरद पवारच (Sharad Pawar) किंग असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभा निवडणूक काही नवीन नाही. यावेळी देखील शरद पवार जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी मिळू शकते असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेली विधानसभा निवडणूक वेगळी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 21, काँग्रेसने 17 आणि शरद पवार गटाने 10 जागांवर निवडणूक लढवली होती.

राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?

तर आगामी विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करत असल्याने महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube