राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?

राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?

Ravikant Tupkar On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर आज पुण्यात पत्रकार परिषद घेत रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नवीन पक्ष म्हणून महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने रविकांत तुपकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आली होती. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 6 जागांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये रविकांत तुपकर म्हणाले, स्वाभिमानीने परवा जो धक्कादायक निर्णय माझ्या विरोधात घेतला आणि मला संघटनेपासून मला वेगळं केलं तसेच राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली ती ऐकून मला धक्का बसला आहे. आज आमची 4 तास चर्चा झाली असून आम्ही काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.

संघटनेसाठी मी अनेकदा जेलमध्ये गेले, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या आणि लाठ्या काठ्या खाल्ल्या. 2007 मध्ये जेव्हा मी राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा ही संघटना फक्त कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती मात्र आज संघटना नाव रुपाला आली आणि माझी गरज संपली. कोल्हापुरात 3 तालुक्यापुरती  असलेली संघटना आम्ही राज्यभारत नेली, राजू शेट्टी किती ग्रेट आहेत हे लोकांना सांगितलं. आजची आमची बैठक फेल जावी म्हणून माझी घाई घाईत हकालपट्टी करण्यात आली मात्र ही बैठक चालवळीची पुढली दिशा ठरवण्यासाठी होती. असं या पत्रकार परिषदेमध्ये रविकांत तुपकर म्हणाले.

2014 ला मला चिखली मधून लढण्याचे आदेश दिले होते मात्र ऐनवेळेस मला सांगण्यात आलं आपली भाजप सोबत युती झाली आहे तू लढू नको. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सदाभाऊ यांनी सांगितलं तुझं बलिदान वाया जाऊ देणार नाही सरकार आल्यावर तुला महामंडळ देऊ. त्यानंतर मला महामंडळ मिळाले पण त्यानंतर मी मार्फसारखे तो लाल दिवा सोडून आलोय. प्रत्येक वेळेस तयारी करायला लावायचं आणि त्याबद्दल्यात काहीतरी घ्यायचं ही त्यांची सवय असा आरोप देखील त्यांनी राजू शेट्टीवर या पत्रकार परिषदेमध्ये लावला.

2002 साली शरद जोशी यांनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केला, नंतर भाजप सोबत युती झाल्याने आमदारकीची जागा न सुटल्याने तुम्ही स्वतःचा सवता सुबा मांडला. तुम्ही शरद जोशीना सोडल आणि शरद जोशीचा पाठीत खंजीर खुपसला तुम्ही दर पाच वर्षाला भूमिका बदलता त्यावर कोणती समिती नेमता? एखादा नेता मोठा होत असेल तर त्याचे पाय छारायचे काम राजू शेट्टी करत आहे असं देखील यावेळी रविकांत तुपकर म्हणाले.

मोठी बातमी! अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून ट्रक खाली कोसळला

तसेच आजच्या बैठकीला राजू शेट्टी यांच्यासोबत असणारे जवळपास 80% पदाधिकारी आमच्यासोबत आले आहे. या बैठकीला विदर्भ, कोकण, मराठवाडामधील पदाधिकारी आले होते. अशी माहिती देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube