खेडकरांनी धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस… अधिकारीच पोहचले थेट गेस्ट रुमच्या दारावर

खेडकरांनी धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस… अधिकारीच पोहचले थेट गेस्ट रुमच्या दारावर

वाशिम : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (trainee IAS Puja Khedka) यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठीची पुणे पोलिसांची नोटीस धुडकावून लावली आहे. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी वाशिम पोलिसांच्या (Washim Police) पथकाने आज (19 जुलै) सकाळी थेट विश्रामगृह गाठले. तिथे शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी कक्षात खेडकर थांबल्या आहेत. तिथेच त्यांचा जबाब घेण्यासाठी पोलीस अधिकारी सकाळपासून थांबून आहेत. (Washim Police Station’s Police officers arrive at the residence of trainee IAS Puja Khedkar to question her)

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीबाबतचा जबाब नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकर यांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती. हा जबाब नोंदविण्यासाठी त्यांनी काल रात्रीच निघणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांच्या एका पथकानेच थेट विश्रामगृह गाठले.

पूजा खेडकर या सध्या वाशीम येथील शासकीय विश्रामगृहात ‘व्हीआयपी’ कक्षात मुक्कामास आहे. नुकतेच राज्य सरकारने त्यांना कार्यमुक्त केले आहे. 23 जुलैपूर्वी त्यांना मसुरी येथील लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये रुजु व्हायचे आहेत. मात्र तरीही त्यांनी अद्याप वाशिम सोडलेले नाही. मात्र आता येथील अधिकारी नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाची त्यांच्यावर मेहेरनजर का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विशाळगड हिंसाचाराला सरकार कसं काय जबाबदार? अजितदादांचा संभाजीराजेंना सवाल…

मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी :

धडवली (ता. मुळशी) शेतकऱ्यांना पिस्तूल रोखत धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पौड पोलिसांनी महाडमधील हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना गुरुवारी सकाळी अटक केली. त्यानंतर दुपारी पौड दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर. जी. बरडे यांच्या न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तथापि दिलीप खेडकर, अंबादास खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल असून ते अद्याप फरार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube