JN.1 New variant of Corona and atmosphere of fear Experts give important advice : जगभरात 2019 मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा (Corona) प्रादुर्भाव वेळोवेळी वाढतच आहे. कोविड साथीच्या दोन वर्षे जगात कहर केला होता. आजही जेव्हा कोरोनाचे नाव येते, तेव्हा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जीवनाचे आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांचे दृश्य आठवते. परंतु आता पुन्हा एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा काही देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू (Covid Cases) लागले आहेत. कोरोनाचा JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार आहे. जो ऑगस्ट 2023 मध्ये सापडला आणि भारतात डिसेंबर 2023 पासून आहे. यावर तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. काय आहे हा नेमका प्रकार जाणून घेऊ…
उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन, मंत्र्यांशी खलबतं; प्रतिनिधीमंडळात खासदाराची एन्ट्री, वाचा काय घडलं?
JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार (sub varient) आता VOI (Varient of Interest) या पदावर विराजमान झालाय . म्हणजे हा लक्ष ठेवण्यासारखा विशेष प्रकार आहे असे WHO ला वाटतंय. पण JN.1 बद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. मीडिया वाढती संख्या आणि भीतीचा उल्लेख करून भीती वाढू देत आहे . बरेच जण पुन्हा ‘हे खोटे आहे’ असा समज करून सरकारला नावे ठेवत आहेत. तुम्ही कोणत्या गटात आहात ? की तुम्ही माहिती घेऊन काळजी न ‘करता’ काळजी ‘घेणारे’ आहात? जाणून घे सविस्तर…
1. नवा JN.1 करोना विषाणू खरा आहे का?
होय. अमेरिकेमध्ये सप्टेंबर मध्ये सापडला होता तेव्हा 0.1% रुग्ण याचे होते. डिसेंबर 8 ला 15-29% रुग्ण या उप प्रकारचे आहेत. म्हणजे हा वेगाने वाढणारा उपप्रकार आहे. इथेही अशी अपेक्षा आपण करू शकतो.
2. आत्ताच नेमका कसा सापडला?
नवे उपप्रकार सतत सापडत असतात पण त्याच्या बातम्या होत नाहीत. कोणता नवा उपप्रकार वेगाने वाढेल याचा अंदाज करणे कठीण आहे कारण म्युटेशन कधीही घडू शकतात. अमेरिकेत बहुदा याच्या नंतरचा प्रकारही सापडलाय (HV.1), एक बातमी वाचण्यात आली.
3. रुग्णसंख्या का वाढत आहे?
महत्वाची 3 कारणे असू शकतात (जंतू, माणूस,आणि वातावरण हे त्रिकुट व त्यातील बदल प्रत्येक आजारामध्ये महत्वाचे असतात , कसे ते बघूया )
वातावरण – थंड व कोरडे वातावरण असताना श्वसनाचे आजार आणि मुख्यतः करोना संसर्ग वाढतो हे दर वर्षी घडणारी घटना आहे . याची विविध कारणे आहेत , जी आपल्या वागण्याशी संबंधित आहेत. म्हणजे आत्ताचे वातावरण रुग्णसंख्या वाढीला पोषक आहे.
अवकाळीचा मोठा फटका! संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांची पीकं गेली वाहून
जंतू – करोनाचा नवा उपप्रकार संसर्ग घडवण्यासाठी अधिक सक्षम आहे . ओमायक्रोन बाबत माझ्या जुन्या पोस्ट वाचल्या असतील तर तुमच्या सहज लक्षात येईल. हा BA.2.86 च्या कुटुंबातील प्रकार आहे आणि यामध्ये S प्रोटीन मध्ये एक म्युटेशन (बदल) झाल्याने आपल्या शरीरातील इम्युनिटी पासून बचाव करण्याची क्षमता याला मिळालेली आहे. (Immune escape) – शरीराला इम्युनिटी नव्याने निर्माण करावी लागणार आहे.
Spy Jyoti Malhotra : कसा बनवतो गुप्तहेर, कसं काम करतं नेटवर्क?; वाचा SPY जगाची संपूर्ण ABCD
माणूस- संसर्ग, विशेषतः ओमायक्रोन संसर्ग – दणकट इम्युनिटी निर्माण करू शकत नव्हते हे आपण वाचले आहेच. आणि लसीकरणाची इम्युनिटी संसर्ग टाळण्याएवढी सक्षम राहिली नाहीये . बऱ्याच जणांनी अकारण भीतीपोटी बूस्टर (precaution) डोस घेणे टाळले होते. त्यामुळे इम्युनिटीची भिंत आता पुरेशी घट्ट नाही . थोडक्यात , सध्या परिस्थिती विषाणूच्या बाजूने झुकलेली आहे आणि आपण काही खास प्रयत्न केले नाही तर संसर्ग आपल्यापर्यंत आरामात पोचू शकेल.
भाजप सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये Operation Sindoor शिकवले जाणार
अजून एक कारण रुग्णसंख्या वाढण्यासाठी महत्वाचे आहे. नव्या उपप्रकारावर लक्ष ठेवून मृत्युदर समजावा यासाठी सध्या सर्वत्र संशयित लक्षणे असतील तर तपासणी व विषाणूचे प्रकार तपासले जात आहेत. ही नियंत्रणाची महत्वाची कृती आहे. यामुळे आपल्याला नवे रुग्ण सापडल्याने वेगाने साथ वाढतेय असे जाणवू शकेल पण ती संख्या फक्त एक छोटा हिस्सा असतो हे आपण जाणतो . एकूण रुग्ण हे नेहमीच त्याहून जास्तच असतात. स्वतःची व कुटुंबाची काळजी वाढवणे आता महत्वाचे आहे.
4. हा संसर्ग धोकादायक आहे का?
याची लक्षणे डेल्टा पेक्षा सौम्य आहेत म्हणजे इतर ओमायक्रोन प्रमाणे – सर्दी , खोकला, ताप, जुलाब इ. अशी विविध लक्षणे दिसू शकतात. सध्या एखादे आजारपण असेल तर कोविड सारखी काळजी घेणे याने नुकसान होणार नाही. लक्षणे असतील तर फक्त व्हायरल सर्दी समजून दुर्लक्ष न करता, शक्यतो तपासणी करून घरी आयसोलेट होऊन पुढील प्रसार टाळणे महत्वाचे आहे . जोखमीच्या लोकांपासून अंतर राखा . ओमायक्रोन सौम्य वाटला पण ज्यांना झाला त्यांना त्याचा त्रास आठवत असेलच. ओमायक्रोनने देखील मृत्यू झालेच होते त्यामुळे जोखीम जास्त असणारे लोक (इतर आजार, वय जास्त असणारे, गरोदर माता इ. ) यांनी अधिक काळजीपूर्वक राहावे. तसेच मुलांनाही जपावे. आकस्मिक हृदयरोगाचे मृत्यूवर जो अभ्यास आयसीएमआरने केला.
भारत पाकिस्तानच्या वादात बांग्लादेशची चांदी; एलन मस्कच्या कंपनीशी मोठी डील, काय घडलं?
दरम्यान भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे पुन्हा हळूहळू वाढू लागली आहेत. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, 12 मे पासून अपडेट केलेल्या डॅशबोर्डवर एकूण 257 सक्रिय रूग्ण दिसून येत आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून नोंदवली गेली (Health Update) आहेत. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.