Download App

आरोग्य विभागात 1729 पदांची भरती, महिन्याला 1 लाख 77 हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024: आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे फार अवघड आहे. मात्र, तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Maharashtra Public Health Department) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी 1729 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची नावे, भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक, पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यात एसयूव्हीची फुटली काच 

या भरतीअतंर्गत वैद्यकीय अधिकार गट अ पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. 1729 जागा भरण्यात येणार असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

पदांचा तपशील-

M.B.B.S. आणि पदव्युत्तर पदवी/पदविका – 1446 जागा

बीएएमएस आणि पदव्युत्तर पदवी/पदविका – 283 जागा

वरील जागांपैकी, 69 जागा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर एकूण जागांपैकी 17 जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

BMC मध्ये मोठा खेळ! भाजप-शिवसेनेला कोट्यावधींचा निधी, ‘मविआ’च्या आमदारांना ‘शून्य’ रुपये 

शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

पगार-
या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी (7वा वेतन आयोग वेतस्तर 20 वेतनश्रेणी 56100-177500) असा असून इतर भत्ते लागू राहणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे-

शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका.

शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारीख प्रमाणपत्र.
अनुभव प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

संबंधित पदासाठी महाराष्ट्र राज्य नोंदणी प्रमाणपत्र (कायम), नोंदणीचे नूतनीकरण आणि परिषद I कार्ड.

आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचे २ फोटो,
पॅन कार्ड

ऑनलाईन अर्ज कुठे भरावा?
महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्ग वैद्यकीय अधिकारी (S-20) या पदासाठी संपूर्ण भरती जाहिरात/अर्जाची माहिती http://arogya.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यानुसार, उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे.

follow us