आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्याच निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

गळ्यात कांद्याच्या माळा अन् हातात निवेदन, शेतकऱ्याने पवारांचा ताफा अडवत मांडल्या व्यथा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण हे विधेयक संमत करुन कायदा करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध व अनुषांगिक साहित्य खरेदीसाठी व पुरवठा पद्धती गतीमान व सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना झाली आहे.

या औषध खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागातर्गंत येणाऱ्या सर्व साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. त्यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवून राज्यातील 4 कोटी 39 लाख महिलांची आरोग्य तपासणी केली आहे.

Letsupp Special रामदासभाईंनी अनिल परबांसाठी खड्डा खोदला पण सख्खा भाऊच अडकला!

त्याशिवाय २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मेळघाटातील कुपोषणावर मात करण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना सुविधा, उपचार करण्याचे कामही हाती घेतले आहे. मंत्री डॉ. तानाजी सांवत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या प्रभावी कामगिरीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पुरस्कार विभागाला मिळाले आहेत.

गोवर संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करून गोवर रोखण्यासाठी कालबद्ध लसीकरण मोहीम राबवून गोवर नियंत्रणात आणला. त्यासोबतच कोविड काळात काम करणाऱ्या ५९७ परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत भरती करण्याचा निर्णय घेत राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यातील शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यातील आरोग्य सुविधा नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा आरोग्य मंत्र्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

राज्यात सन २०१७ पूर्वी औषध, कन्झुमेबल्स उपकरणे व यंत्रसामुग्री तसेच इतर अनुषंगिक वस्तुची खरेदी प्रत्येक विभागाकडून करण्यात येत होती. राज्यात वेगवेगळ्या संस्थांकडून खरेदी करण्यात येत असल्याने वेगवेगळे दर प्राप्त होत होते. दरामध्ये एकसुत्रता आणण्यासाठी व एकत्रित संख्येच्या खरेदीचा न्युनतम दरासाठी फायदा मिळावा यासाठी २६ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित अंर्तगत खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला होता.

अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार…

एकत्रित साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी हाफकीनची होती, त्यांच्याकडील ६० टक्के खरेदीचा सरासरी भार आरोग्य विभागाचा आहे. या हाफकीन महामंडळ मर्यादित सुरु असलेल्या साहित्य खरेदी व वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व अन्य विभागाच्या औषध व अनुषांगिक साहित्य खरेदीसाठी व पुरवठा पद्धती गतीमान व सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

त्यामध्ये प्रधिकरणाकडून करण्यात येणारी खरेदी धोरणानुसार करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलच्या कार्यपद्धतीचा अवलंब यात करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांच्या काळात आरोग्य विभागाशी संबधित निर्णय घेत आरोग्य विभागातील सेवा, सुविधा शाश्वत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे भविष्यात आरोग्य विभागाचे काम शाश्वत प्रणालीमुळे अविरतपणे करणे शक्य होणार आहे. या प्रधिकरणाच्या निर्मितीसाठी दोन वर्षाला आस्थापना बांधकाम इतर खर्चासाठी अंदाजित ६५१९.५८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.

अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार…

हे या प्राधिकरणामार्फत खरेदी करता येणार आहे, याचे आरोग्य खात्याच्या आठ विभागात गोडावून असणार आहेत. खासगी औषध विक्रेता, खासगी वैद्यकीय व्यवासायिक, डॉक्टर याठिकाणी औषध खरेदी करू शकणार आहेत. केंद्रसरकारच्या यंत्रणाही या माध्यमातून याठिकाणी खरेदी करू शकणार आहेत. इतर राज्यातील आरोग्य विभाग, खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्सही या ठिकाणी औषधांची तसेच वैद्यकीय उपकरणे आणि वस्तूंची खरेदी करु शकतील.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हाफकिन इन्स्टिट्यूटला त्यांच्या औषध व लस निर्मिती आणि त्यावरील संशोधन या मूळ उद्दिष्टापासून दूर ठेवण्यात आले होते. कोरोना काळात हाफकीनला लस निर्मितीचे अधिकार मिळाले असते तर राज्य शासनाला त्याचा अधिक फायदा झाला असता. मात्र, औषध खरेदी किंवा विक्री करणे हे हाफकीनचे उद्दिष्ट नसून गंभीर आजारावर व सर्पदंशावर लस संशोधन आणि औषध निर्मिती करणे हे त्यांचे मूळ काम आहे. या कामाला अधिक गतिमान करून औषध व लस निर्मितीसाठी प्रयत्न करण्याकरिता हाफकिनला नव संजीवनी देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube