Download App

गुड न्यूज! एमपीएससीच्या पदभरतीसाठी मराठा आरक्षण लागू, आयोगाकडून परिक्षेचे शुध्दीपत्रक जारी…

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धीपत्रक जाहीर करून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू

Maratha reservation applicable in MPSC recruitment : एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धीपत्रक जाहीर करून त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू केले. 29 डिसेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये एमपीएससीने (MPSC) 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली. उल्लेखनीय म्हणजे, मराठा उमेदवारांना आता वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही मागासवर्गीयांसाठी लागू असलेल्या वयोमर्यादेचा लाभ घेऊन पुन्हा अर्ज करता येणार आहे.

अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी सावत्र वडील परवेझ टाक दोषी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल 

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्य आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण दिलं. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र, आरक्षण लागू होण्यापूर्वीच ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘SEBC’ आरक्षण लागू करून शुद्धीपत्रक जारी केले जाणार आहे.

चुकीच्या प्रकरणात मला गोवले, मी जड अंत:करणानेच पक्ष बदलला, नियतीने ही वेळ…; वायकरांचा खुलासा 

एमपीएससीच्या जाहिरातीमध्ये आता आरक्षण लागू केलं जाणार असल्यानं MPSC ने 28 एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ तसेच 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

बुधवारी आयोगाने सुधारित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचेही शुध्दीपत्रक जाहीर करून त्यात 250 जागांची वाढ केली आहे. यात ‘SEBC’ म्हणजेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. याशिवाय या आरक्षणाच्या लाभार्थ्यांसाठी अनेक सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी एमपीएससी परीक्षांमध्ये आरक्षण लागू
दरम्यान, मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले. त्यांच्या स्वाक्षरीनंतर 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातील 10 टक्के आरक्षण लागू झालं. त्यानुसार आता आगामी एमपीएससी परीक्षांमध्ये मराठा आरक्षण लागू झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज