Meesho IPO चा चमत्कार, सह-संस्थापक विदित अत्रे अब्जाधीश; कमावले हजारो कोटी रुपये

Meesho IPO : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म मीशोचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात नुकतंच लिस्टिंग झाले असून आयपीओ लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी

Meesho IPO

Meesho IPO

Meesho IPO : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म मीशोचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात नुकतंच लिस्टिंग झाले असून आयपीओ लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी कंपनीचे सह-संस्थापक विदित अन्ने अब्जाधीशांच्या कल्बमध्ये सामील झाले आहे. आयपीओ लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 74 टक्क्यांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मीशो शेअर्सची किंमत 111 च्या इश्यू किमतीवरुन 193 प्रति शेअरवर पोहचली आहे. लिस्टिंगच्या दिवसापासून शेअर्समध्ये तब्बल 74 टक्क्यांची वाढ झाल्याने विदित अन्नेंची एकूण संपत्ती थेट 1 अब्ज डॉलर्स (अंदाजे 9,128 कोटी) वर गेली आहे.

विदित अन्ने (Vidit Anne) यांच्याकडे मिशोचा 472.5 दशलक्ष शेअर्स (11.1 टक्के हिस्सा) आहेत. तर दुसरीकडे कंपनीचे दुसरे सह-संस्थापक संजीव बर्नवाल यांच्याकडे 316 दशलक्ष शेअर्स आहेत ज्याची किंमत आता अंदाजे 6,099 कोटी आहे. 2015 मध्ये मिशोची स्थापना विदित अन्ने आणि संजीव बर्नवाल यांनी केली होती.

विदित अत्रे मीशोचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (Meesho IPO) म्हणून काम करतात. 13 ऑगस्ट 2015 रोजी कंपनीच्या स्थापनेपासून ते कंपनीसोबत आहेत. ते आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवीधर आहेत आणि कंपनीची रणनीती, महत्त्वाचे निर्णय आणि दीर्घकालीन वाढीची दिशा ठरवतात.

कंपनीमध्ये मेटा, सॉफ्टबँक, सेक्वोइया कॅपिटल, वाय कॉम्बिनेटर, नॅस्पर्स आणि एलिव्हेशन कॅपिटल सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे, ज्यामुळे मिशोची मागणी बाजारात वाढली आहे. मीशो कंपनीची सुरुवात फ्लिपकार्टच्या सुरुवातीच्या मॉडेलपासून प्रेरित असलेल्या हायपरलोकल फॅशन डिलिव्हरी अ‍ॅप, फॅशनियर म्हणून झाली होती.

IPL 2026 Auction : 125 कोटींपेक्षा जास्त कमाई अन् आयपीएलची पहिली महिला ऑक्शनर मल्लिका सागर कोण आहे?

विदित अत्रेंचा प्रवासमीशोपूर्वी, विदित अत्रे आयटीसी लिमिटेड आणि इनमोबीमध्ये काम करत होते.  फोर्ब्स आशिया 30 अंडर 30 आणि फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 (2018), एंटरप्रेन्योर मॅगझिनच्या 35 अंडर 35 (2019) आणि फॉर्च्यून इंडियाच्या 40 अंडर 40 (2021, 2024 आणि 2025) मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version